Bhuvneshwar Kumar Nupur Nagar Daughter: भुवी झाला 'बाप' माणूस; नुपूरनं लेकीला दिला जन्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhuvneshwar Kumar, Nupur Nagar

भुवनेश्वरच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला.

भुवी झाला 'बाप' माणूस; नुपूरनं लेकीला दिला जन्म

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

भारतीय टिमचे गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar )यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. भुवनेश्वरची पत्नी नुपूर नागर (Nupur Nagar) हिने आज (बुधवार ता.२४) रोजी दिल्ली येथे एका हाॅस्पिटलात मुलीला जन्म दिला. अशी माहिती मेरठ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (MDCA) कोषाध्यक्ष राकेश गोयल (Rakesh Goyal) यांनी दिली.

भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. २३ नोव्हेंबर २०१७ साली भुवनेश्वर कुमार आणि नुपूर लग्नबंधनात अडकले. नुपूर ही दिल्लीजवळ नोए़़डा येथे राहत होती. भुवनेश्वरच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता भुवनेश्वर कुमार यांच्या मुलीचा जन्म झाला.

भुवनेश्वर कुमारने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भाग घेतला. त्याने मालिकेतील सर्व सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारचे वडील किरण पाल सिंह यांचे यावर्षी २० मे रोजी निधन झाले. भुवनेश्वर कुमारने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही. तो लवकरच आपल्या मुलीचा फोटो आणि तिच्या नावासह ही आनंदाची बातमी शेअर करेल याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

loading image
go to top