नेहरा, धवन आणि पंतला घडवणारे गुरु काळाच्या पडद्याआड

नेहरा, धवन आणि पंतला घडवणारे गुरु काळाच्या पडद्याआड
Summary

भारताच्या १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडवणारे प्रशिक्षक तारक सिन्हा यांचे निधन. रमण लांबा, आकाश चोप्रा, आशिष नेहरा, शिखर धवन, ऋषभ पंत यांच्या जडणघडणीमध्ये सिन्हा यांची मोठी भूमिका

भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणीचे खेळाडू देणारे प्रशिक्षक तारक सिन्हा यांचे निधन झाले. बराच काळ ते आजाराशी झुंज देत होते. शनिवारी सकाळी त्यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू त्यांनी देशाला दिले. त्यांनी सोनेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेटपटूंना घडवले होते.

सोनेट क्लबने एका निवेदनात म्हटलं की, जड अंतकरणाने आम्ही सांगत आहोत की, दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेलेले सोनेट क्लबचे संस्थापक तारक सिन्हा यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या शिष्यांमध्ये उस्ताद जी नावाने सिन्हा परिचित होते. गेल्या पाच दशकांपासून त्यांनी क्रिकेटपटूंना घडवले. त्यांच्यातील कौशल्य शोधून क्लबच्या माध्यमातून खेळण्यासाठी एक व्यासपीठ सिन्हा यांनी उपलब्ध करून दिलं.

सिन्हा यांच्या एका शिष्याने नाव जाहीर न करता त्यांची अखेरपर्यंत काळजी घेतली आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा दिल्या. ऋषभ पंतला मार्गदर्शन करणारे त्यांचे सहकारी देवेंदर शर्मा हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.

दिल्ली क्रिकेटमधील सुरिंदर खन्ना, मनोज प्रभाकर, रमण लांबा, अजय शर्मा, अतुल वासन, संजीव शर्मा, केपी भास्कर यांनी सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. तसंच ९० च्या दशकात आकाश चोप्रा, अंजुम चोप्रा, रुमेली धर, आशिष नेहरा, शिखर धवन, ऋषभ पंत यांनाही मार्गदर्शन केलं. महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. तेव्हा नुकतंच झूलन गोस्वामी आणि मिताली राज यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com