....म्हणून श्रेयस ऐवजी सिडनीत पर्वत उचलणाऱ्या हनुमाला संधी |RSA vs IND | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer And Hanuma Vihari

....म्हणून श्रेयस ऐवजी सिडनीत पर्वत उचलणाऱ्या हनुमाला संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहन्सबर्ग कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जानसेन (Marco Jansen) आणि रबाडा (Kagiso Rabada) ओलिव्हरच्या (Duanne Olivier) भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजाचे इरादे अक्षरश: गळून पडले. कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) च्या अर्धशतकानंतर भारतीय रविंचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) केलेल्या चिवट खेळीच्या जोरावर टीम इंडियाला (Team India) 202 धावांपर्यंत मजली.

सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला पहिला धक्का बसला. विराट कोहली (Virat Kohli) पाठिच्या दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अनुपस्थितीत हनुमा विहारीला (Hanuma Vihari) संधी मिळाली. त्याने 53 चेंडूचा सामना करत नेटाने खेळण्याची क्षमता दाखवली. पण 20 धावा करुन त्याला माघारी परतावे लागले. हनुमाच्या निवडीनंतर अनेकांना धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) ऐवजी त्याला संधी कशी मिळाली असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन असेल.

हेही वाचा: RSA vs IND : पहिल्या दिवसाअखेर आफ्रिका 167 धावांनी पिछाडीवर

श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान जवळपास निश्चित होते. पण तोही पोट दुखीमुळे संघ निवडीसाठी अनुपलब्ध होता. त्यामुळे हनुमा विहारीला (Hanuma vihari) संधी मिळाली.

लढवय्या विहारी

हनुमा विहारी हा चिवट फलंदाज आहे. मागील वर्षाच्या सुरुवातीलाही त्याला दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संघात स्थान मिळाले होते. सिडनी कसोटीत स्वत: दुखापती झाल्यानंतर त्याने 161 मिनिटे फलंदाजी केली होती. अश्विनच्या साथीनं त्याने भारतीय संघाचा पराभव टाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

हेही वाचा: SA vs IND : रहाणे-पुजाराचं करायचं काय?

विहारीची दक्षिण आफ्रिकेत तीन अर्धशतकं

भारतीय वरिष्ठ संघ आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी इंडिया ए संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. या संघात हनुमा विहारीही होता. त्याने 5 डावात तीन अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे त्याला संधी देण्याच निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असावा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top