RSA vs IND : पहिल्या दिवसाअखेर आफ्रिका 167 धावांनी पिछाडीवर

RSA vs IND
RSA vs INDTwitter

जोहन्सबर्गच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवस आफ्रिकेच्या संघाने गाजवला. दिवसाअखेर एक विकेट गमावून त्यांनी धावफलकावर 35 धावा लावल्या होत्या. डेन एल्गर (Dean Elgar) 11(57) तर पीटरसेन (Keegan Petersen) 14 (39) धावांवर नाबाद खेळत होते. मोहम्मद शमीनं दक्षिण आफ्रिकेच्या डावातील चौथ्या षटकात भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने मार्करमला 7 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर आफ्रिकनं संघाने कोणतीही विकेट गमावली नाही. सध्याच्या घडीला ते 167 धावांनी पिछाडीवर आहेत.

भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. लोकेश राहुल 50(133) आणि अश्विन 46 (50) वगळता एकालाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी संघाचा पहिला डाव अवघ्या 202 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानेसन (Marco Jansen) याने सर्वाधिक चार तर ओलीव्हर (Olivier) रबाडा (Rabada) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.

RSA vs IND
विराटची दुखापत पडणार पथ्यावर! घरच्या मैदानावर @100 ची संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील दुसऱ्या कसोटीला सामन्याला जोहान्सबर्ग येथे सुरुवात होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीसाठी विराट कोहली ऐवजी केएल राहुल (KL Rahul) आला होता. विराट कोहलीने (Virat Kohli) पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटीत (RAS vs IND 2nd Test) माघार घेतली आहे. त्याच्या ऐवजी संघात हनुमा विहारीची वर्णी लागली आहे.

दक्षिण आफ्रिका संघानेही आपल्या संघात दोन बदल केले आहे. क्विंटन डिकॉकच्या जागी कायल वेरेयन (Kyle Verreynne) याचा समावेश केला आहे. तर मुल्डरच्या जागी ड्युने ऑलिव्हरला (Duanne Olivier) संधी मिळाली आहे. (RAS vs IND Live 2nd Test Day 1)

पहिल्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिका 1 बाद 35 धावा; भारत पहिला डाव : सर्व बाद 202 धावा

14-1 : मोहम्म शमीनं दक्षिण आफ्रिकेला दिला पहिला धक्का; मार्करम 5 धावा करुन तंबूत

लोकेश राहुल 50 आणि अश्विनने केली 46 धावांची खेळी, बुमराह 14 धावांवर राहिला नाबाद

  • 202 : रबाडाने मोहम्मद सिराजची विकेट घेत भारताचा पहिला डाव आटोपला

  • 187-9 : अश्विनचं अर्धशतक हुकलं; पुन्हा एकदा मोर्कनं घेतली विकेट

  • 185-8 : मोहम्मद शमी 9 धावांची भर घालून रबाडाच्या गोलंदाजीवर झाला कॅच आउट

  • 157-7 : ओलिव्हरनं शार्दुल ठाकूरला खातेही उघडू दिले नाही

  • 156-6 : रिषभ पंतच्या रुपात टीम इंडियाला सहावा धक्का; त्याने 43 चेंडूत 17 धावा केल्या. मार्कोनं त्याची विकेट घेतली

  • भारताचा लढवय्या राहुल देखील परतला पॅव्हेलियनमध्ये; भारताच्या 5 बाद 123 धावा

  • केएल राहुलचे झुंजार अर्धशतक, भारताची शंभरी पार

  • हनुमा विहारी 20 धावांची भर घालून परतला; भारताच्या 4 बाद 91 धावा

  • उपहारापर्यंत भारताच्या 3 बाद 53 धावा

  • अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा पाठोपाठ बाद, भारताचे 3 फलंदाज पन्नाशीच्या आतच पॅव्हेलियनमध्ये

  • भारताला पहिला धक्का, मयांक अग्रवाल 26 धावांवर बाद

  • भारताच्या 5 षटकात बिनबाद 15 धावा

  • दक्षिण आफ्रिका संघातही दोन बदल

  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय.

  • विराट कोहलीची पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटीतून माघार, संघात हनुमा विहारीचा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com