VIDEO : 'लॉर्ड' टोपण नाव कधी पडलं; शार्दुल ठाकूरनं सांगितला किस्सा |Shardul Thakur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur With Team India

VIDEO : 'लॉर्ड' टोपण नाव कधी पडलं; शार्दुल ठाकूरनं सांगितला किस्सा

भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकुरनं (Shardul Thakur) दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात जबरदस्त कामगिरी करुन दाखवलीये. मैदानातील दमदार कामगिरीमुळे सोशल मीडियावर मुंबईकर शार्दुल ठाकूर चांगलाच चर्चेत आहे. शार्दुल ठाकुरच्या नावासोबत ‘लॉर्ड’ हा शब्दही ट्रेंडिगमध्ये पाहायला मिळतो. शार्दुल ठाकूरला Lord का म्हणतात असा प्रश्नही काही चाहत्यांना पडलाय. खुद्द शार्दुलनेच या टोपण नावामागचं रहस्य उलगडेल आहे. (shardul thakur share story behind nickname lord)

जोहन्सबर्गच्या मैदानात सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात (India vs South Afirca) शार्दुल ठाकूरनं सात विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यात जोरदार कमबॅक केले होते. चौथ्या दिवशीही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्याच्या भात्यातून फटकेबाजीही पाहायला मिळाली. भारताच्या दुसऱ्या डावात बॅटिंग करताना त्याने 24 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा कुटल्या. त्याची ही छोटीखानी खेळी टीम इंडियासाठी उपयुक्त अशीच आहे.

हेही वाचा: हीच ती वेळ! पुजाराला संधी द्या, पण अजिंक्यला बाहेर बसवा : गंभीर

शार्दुल ठाकुरने बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये कमाल दाखवल्यानंतर सोशल मीडियावर ‘लॉर्ड शार्दुल ठाकुर’ ट्रेंड पाहायला मिळत आहे. लॉर्ड या टोपण नावामागची कहाणी खुद्द शार्दुलने चाहत्यांसाठी शेअर केलीये. भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि विद्यमान गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे यांच्यासोबतच्या संवादावेळी शार्दुलने टोपण नावासंदर्भात भाष्य केले. तो म्हणाला की, लॉर्ड म्हणायला सुरुवात कोणी केली माहिती नाही. पण मागील वर्षी इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातून ‘लॉर्ड’ नावाचा सिलसिला सुरु झाला.

हेही वाचा: RSA vs IND : टीम इंडिया जिंकेल का? आकडेवारीत दडलंय उत्तर

बीसीसीआयने (BCCI) अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शार्दुल ठाकूरचा खास व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओथ शार्दुल म्हणतोय की, खरंच मला माहित नाही लॉर्ड नाव कोणी दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यानंतर आम्ही घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध खेळलो. त्यावेळीपासूनच मला लॉर्ड असे म्हणायला सुरुवात झाली. आयपीएलआधी या मालिकेत चांगली कामगिरी झाली होती. एका ओव्हरमध्ये अधिकवेळा दोन विकेट घेतल्यानंतर माझ्या नावासोबत लॉर्ड हा शब्द जोडला गेल्याचे ऐकायला मिळाले, असे शार्दुलनं सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top