हीच ती वेळ! पुजाराला संधी द्या, पण अजिंक्यला बाहेर बसवा : गंभीर|Hanuma Vihari vs Ajinkya Rahane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pujara And Rahane
अर्धशतक करुनही अजिंक्य रहाणेनवर टांगतील तलवार, गंभीरनं सांगितल त्याची जागी घेण्यासाठी कोण आहे परफेक्ट #AjinkyaRahane #CheteshwarPujara #CricketNews #GautamGambhir #HanumaVihari #Indvssa #IndiavsSouth

हीच ती वेळ! पुजाराला संधी द्या, पण अजिंक्यला बाहेर बसवा : गंभीर

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) अर्धशतक झळकावले. त्याने 78 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार खेचत 58 धावांचे योगदान दिले. तरीही भारतीय माजी क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) अजिंक्यच्या कामगिरीवर खुश नाही. अजिंक्य रहाणेला बाकावर बसवण्याची वेळ आली आहे, असे गंभीरने म्हटले आहे. यावेळी त्याने पुजाराची मात्र पाठराखण केलीये. पुजाराला आणखी एक संधी मिळायला हवी, असे रोखठोक मत गंभीरने मांडले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहन्सबर्गच्या मैदानात सुरु आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रहाणेनं दुसऱ्या डावात 58 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून एखाद्या खेळाडूने केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकलाय. पण जर तो तिसऱ्या कसोटीत खेळला तर बसवायचे कुणाला हा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे.

हेही वाचा: RSA vs IND Day 3 : सामना रंगतदार स्थितीत; दिवसाअखेर आफ्रिका 2 बाद 118 धावा

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमादरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत कोणाला स्थान मिळायला पाहिजे, याबद्दल मत मांडले. तो म्हणाला की, ‘हनुमा विहारीने दोन्ही डावात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. अजिंक्य रहाणेनं भलेही अर्धशतकी खेळी केली असली तरी त्याला अधिक संधी मिळाली आहे. हनुमा विहारी (Hanuma Vihari) केवळ कसोटीतच खेळतो. ऑस्ट्रेलियातही त्याने चांगली कामगिरी केली होती. जर तुम्हाला भविष्याबद्दल विचार करायचा असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे लागेल.

हेही वाचा: RSA vs IND : टीम इंडिया जिंकेल का? आकडेवारीत दडलंय उत्तर

हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 40 धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाने 228 धावांवर 8 विकेट गमावल्या होत्या. विहारीच्या खेळीमुळे टीम इंडियाला 266 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याचा विचार व्हायलाच पाहिजे, असे स्पष्ट मत गंभीरने मांडले.

...म्हणून पुजाराला संधी मिळायलाच हवी

गौतम गंभीर पुढे म्हणाला की, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं ही एक स्पेशलिटी आहे. त्यामुळे पुजाराला या क्रमांकावर खेळवणेच योग्य आहे. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला संधी द्यावी. पुजारा मागील 2 वर्षांपासून शतक करण्यात अपयशी ठरलाय. पण दुसऱ्या डावात 53 धावा करुन त्याने आपल्या भात्यातील जादू कायम असल्याचे दाखवून दिले. त्याने रहाणेसोबत शतकी भागीदारी केली होती. उल्लेखनिय आहे की, भारतीय संघाकडे सध्याच्या घडीला श्रेयस अय्यरच्या रुपात आणखी एक पर्याय आहे. तो अद्याप आफ्रिकेत एकही सामना खेळलेला नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top