Cricket Lover Babu Tangewalaesakal
क्रीडा
पुण्यातील क्रिकेटप्रेमी बाबू टांगेवाल्याच्या मदतीला धावले होते सातारकर; पानशेतच्या पुरात वाहून गेलेला 'संसार' सावरला होता!
Cricket Lover Babu Tangewala : क्रिकेट आणि चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्याला सातारकरही अपवाद नाहीत. सातारकरांनी तर क्रिकेटच्या चाहत्यालाही मदतीचा हात दिला.
Summary
साताऱ्यात मुंबई आणि महाराष्ट्र संघाच्या क्रिकेट सामन्यानंतर (Cricket Matches) खेळाडूंच्या सह्यांची पत्रके काढण्यात आले. सातारकरांनी एक पत्रक एक रुपयाला विकून निधी गोळा केला होता
सातारा : क्रिकेट आणि चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्याला सातारकरही अपवाद नाहीत. सातारकरांनी तर क्रिकेटच्या चाहत्यालाही मदतीचा हात दिला. पुण्यातील बाबू टांगेवाला (Babu Tangewala) या क्रिकेट चाहत्याचे पानशेतच्या पुरात घरादारासह सर्व साहित्य वाहून गेले होते. त्या वेळी त्यांचा संसार सावरण्यासाठी सातारकर धावून आले होते.
