
Cricket news : विल्यम्सन, निकोल्सची शानदार द्विशतके
वेलिंग्टन : पहिल्या सामन्यात शानदार शतक करून न्यूझीलंडला सनसनाटी विजय मिळवून देणाऱ्या केन विल्यम्सने दुसऱ्या सामन्यात आणखी एक पाऊल पुढे टाकताना श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक केले. हेन्री निकोल्सनेही द्विशतकी मजल मारली, त्यामुळे ४ बाद ५८० धावा करणाऱ्या न्यूझीलंडने दिवसअखेर श्रीलंकेची २ बाद २६ अशी अवस्था केली.
विल्यम्सनने २९६ चेंडूत २१५ धावा केल्या. निकोल्सचे द्विशतक पूर्ण होताच न्यूझीलंडने आपला पहिला डाव घोषित केला. १२३ षटके गोलंदाजी केल्यानंतर न्यझीलंडचे चारच फलंदाज श्रीलकेला बाद करता आले.
दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा विलम्सन २६; तर निकोल्स १८ धावांवर नाबाद होते. वर्चस्व राखताना या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६३ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड, पहिला डाव ः ४ बाद ५८० घोषित (डेव्हन कॉन्वे ७८, केन विल्यम्सन २१५ - २९६ चेंडू, २३ चौकार, २ षटकार, हेन्री निकोल्स नाबाद २०० - २४० चेंडू, १५ चौकार, ४ षटकार, कासुन रजिता ३२-६-१२६-२). श्रीलंका पहिला डाव ः २ बाद २६.