Virat Kohli: चित्त्यासारखी लिटन दासची बॉलवर झडप; विराटदेखील झाला चकित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohli: चित्त्यासारखी लिटन दासची बॉलवर झडप; विराटदेखील झाला चकित

India vs Bangladesh 1st ODI : बांगलादेशचा स्टँड-इन कर्णधार लिटन दासने आश्चर्यकारक चपळता दाखवली आहे. बांगलादेशच्या कर्णधाराने ढाका येथे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हवेत उडी मारून विराट कोहलीला बाद करताणा नेत्रदीपक झेल घेतला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लिटन दासने शॉर्ट कव्हरवर उजवीकडे जबरदस्त डायव्ह टाकून हा झेल घेतला.

हेही वाचा: Virat Kohli: विराटनं सिक्स मारले याचे दु:ख नाही, पण पांड्यानं... पाकिस्तानी बॉलर हारिस रऊस बोलून गेला

लिटन दासचा हा झेल पाहून विराट कोहलीलाही धक्का बसला. हा झेल अलीकडच्या काळातील सर्वोत्तम झेलांपैकी एक म्हणता येईल. बांगलादेशसाठी हे मजेदार दृश्य भारतीय डावाच्या 11व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर घडले. शकीब अल हसनचा सामना करताना विराट कोहली कव्हर क्षेत्राच्या दिशेने ड्राइव्हसाठी गेला.

हेही वाचा: Virat Kohli : विराटचा नवा VIDEO त्यावर सूर्याची 'खतरनाक' कमेंट होतेय व्हायरल

विराट कोहलीला चेंडू गॅप मधून काढायचा होता पण त्याचा एक हात बॅटतून सुटला मात्र, त्यानंतरही क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची शक्यता कमीच होती. लिटन दासने हवेत आश्चर्यचकित चित्त्यासारखी झेप घेत कोहलीचा कॅच घेतला.

दुसरीकडे सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि वृत्त लिहिपर्यंत भारतीय संघाने 4 गडी गमावून 100 धावा केल्या आहेत.

टॅग्स :CricketVirat kohli