विराटचा नवा VIDEO त्यावर सूर्याची 'खतरनाक' कमेंट होतेय व्हायरल | Virat Kohli Suryakumar Yadav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Suryakumar Yadav

Virat Kohli : विराटचा नवा VIDEO त्यावर सूर्याची 'खतरनाक' कमेंट होतेय व्हायरल

Virat Kohli Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप संपल्यानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचा नवखा संघ टी 20 आणि वनडे मालिका खेळत आहे. दरम्यान, विराट कोहलीने या विश्रांतीचा चांगला फायदा उचलत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला. दरम्यान, टी 20 वर्ल्डकपमध्ये चार अर्धशतके ठोकत सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पुन्हा एकदा मैदानावर परतण्याच्या तयारीला लागला आहे. नुकतेच बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघ पुढील आठड्यात बांगलादेशला रवाना होईल. यापूर्वी विराट कोहलीने जीममध्ये घाम गाळला.

हेही वाचा: FIFA World Cup साठी भारताचा फुटबॉल संघ पात्र झाला होता पण...

विराट कोहलीने गुरूवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओद्वारे त्याने आपण परतत असल्याचे संकेत दिले. तो या व्हिडिओत ट्रेडमीलवर धावताना तसेच चेसल बॉडीचे व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर भारताचा 360 डिग्री प्लेअर सूर्यकुमार यादवने देखील त्यावर कमेंट केली.

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांचा वर्ल्डकपमधील ब्रोमान्सची खूप चर्चा झाली होती. या दोघांनी भारतासाठी धावांचा पाऊस पाडला होता. दरम्यान, सूर्यकुमार यादवने विराट कोहलीच्या जीममधील व्हिडिओवर टायगरची इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI : संजू - उमरानला संधी, भारताची Playing 11 अन् पावसाची शक्यता; जाणून घ्या एका क्लिकवर

सूर्यकुमार यादव सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी 20 मालिकेत धडाकेबाज फलंदाजी करत त्याने वर्षातील दुसरे टी 20 शतक ठोकले. यानंतर आता तो वनडे मालिकेसाठी देखील सज्ज झाला आहे. या मालिकेत देखील त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तो भारतीय संघाची मधली फळी उत्तमरित्या सांभाळत आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...