esakal | कोरोनामुळे आईचे निधन, प्रियाची डोळे पाणावणारी पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

priya punia

कोरोनामुळे आईचे निधन, प्रियाची डोळे पाणावणारी पोस्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतीय महिला क्रिकेटमधील आणखी एका खेळाडूवर कोरोनामुळे दुख:चा डोंगर कोसळलाय. प्रिया पुनिया हिच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिलीये. प्रियाची पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी अशीच आहे.

हेही वाचा: आईसह बहीणसुद्धा गेली, कोरोनाने वेदावर कोसळला दु:खाचा डोंगर

तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, प्रत्येक वेळी तू मला कणखर होण्यासाठी का सांगत होतीस हे आज अनुभवतीये. तू माझ्यापासून किती दूर आहेस याचा फरक पडत नाही. कारण आई तू नेहमीच माझ्या जवळ असशील. तू माझी मार्गदर्शक आहेस. तुझ्यासोबतचा आठवण क्षणाक्षणाला मला साथ देईल, अशा भावनिक शब्दांत तिने आईसोबतचा फोटो शेअर केलाय. 'कृपया नियमांच पालन करा. सध्याच्या घडीला प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे, असा संदेशही तिने देशवासियांना दिलाय.

हेही वाचा: 'आधारस्तंभ गमावला', वडिलांच्या निधनानंतर पीयूष चावलाची पोस्ट

यापूर्वी महिला क्रिकेट संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिला कोरोनामुळे मोठा धक्का बसला होता. या महिला क्रिकेटरच्या आई आणि बहिणने कोरोनामुळे प्राण गमावले होते. पुरुष क्रिकेटमधील राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू चेतन सकारिया याचे वडिलही कोरोनामुळे गेले. त्याच्याशिवाय पियूष चावलाने आपल्या वडिलांना गमावले आहे.