Record : रोहितची कॅप्टन्सी हिट, पण बॅटिंगमध्ये कोहलीपेक्षाही फ्लॉप

Virat Kohli And Rohit Sharma
Virat Kohli And Rohit SharmaSakal

कॅप्टन्सीतील खांदेपालट टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीवर परिणाम करणार का? असा प्रश्न विराट कोहलीने (Virat Kohli) नेतृत्व सोडल्यानंतर अनेकांना पडला होता. पण रोहितनं यात काही फरक पडणार नाही, हे दाखवून देणारे नेतृत्व करुन दाखवलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्याला टी-20, वनडे आणि कसोटीत व्हाईट वॉश दिला. संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मा (Rohit Sharma) लिलया पेलत असला तरी त्याची फलंदाजी मात्र ढासळली आहे.

रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील तीन डावात 90 धावा केल्या. त्याच्या धावांची सरासरी 30.00 इतकी होती. रवींद्र जडेजा 201, श्रेयस अय्यर 186, रिषभ पंत 185 आणि हनुमा विहारी 124 धावा केल्या. या चार फलंदाजांनी रोहितला मागे टाकले. एवढेच नाहीतर रविचंद्रन अश्विन (87), विराट कोहली (81) आणि मयंक अग्रवाल (59) हे त्याच्या मागे राहिले.

Virat Kohli And Rohit Sharma
साध्याभोळ्या कोचची थोडी गंमत; हार्दिक पांड्याचं वक्तव्य चर्चेत

कोहली आणि रोहितची या वर्षातील कामगिरी

यंदाच्या वर्षातील विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या फलंदाजीतील कामगिरीचा विचार केल्यास रोहित मागे पडताना दिसतोय. रोहित शर्माने तिन्ही प्रकारात मिळून 11 सामने खेळले आहेत. यातील 12 डावात त्याने 23.66 च्या सरासरीने 284 धावा केल्या आहेत. 60 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यावर्षी आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याने एकमेव अर्धशतक झळकावले आहे.

Virat Kohli And Rohit Sharma
पंतची दिमाखदार कामगिरी, दिग्गजाला बसली सणसणीत चपराक

कोहलीनेही रोहित एवढेच सामने खेळले आहेत. पण कोहलीने रोहितपेक्षा एक जादा डाव खेळला आहे. 11 सामन्यातील 13 डावात त्याने 30.76 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. विराटने चार अर्धशतके झळकावली आहेत. 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

रोहित-कोहली शतकाचे अखेरचे शतक कधी?

कोहलीने 22 नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचे शतक झळकावले होते. कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानात डे-नाइट कसोटी सामन्यात कोहलीने बांगलादेश विरुद्ध 136 धावांची खेळी केली होती. तेव्हापासून कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही. दुसरीकडे रोहितने 2 सप्टेंबर 2021 मध्ये ओव्हलच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध शतकी खेळी केली होती. त्याने 127 धावा केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com