esakal | T20 world cup : पात्रता फेरीतील टी-20 सामन्यात द्विशतकी विश्व विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket News

T20 world cup : पात्रता फेरीतील टी-20 सामन्यात द्विशतकी विश्व विक्रम

sakal_logo
By
सुशांत जाधव

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये टांझानिया महिला संघाने नवा विश्व विक्रम प्रस्थापित केलाय. टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत T20 world cup Qualifier मोजाम्बिका संघाचा त्यांनी 200 धावांनी पराभव केला. टांझानिया महिला संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी दुसऱ्यांदा विजय नोंदवला आहे. असा पराक्रम यापूर्वी अन्य कोणत्याही संघाला जमलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा एक विश्व विक्रमच आहे. महिला टी20 वर्ल्ड कप क्वालिफायर (T20 world cup Qualifier) फेरीतील सामन्यात टांझानियाच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 4 बाद 228 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मोजाम्बिका संघ अवघ्या 28 धावांवर आटोपला.

मोजाम्बिका महिला संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टांझानियाची सलामीची फलंदाज फातुमा किबासुने 62 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. तिने 35 चेंडूत10 खणखणीत चौकार खेचून अर्धशतकी खेळी साकारली. मध्यफळीत मवाडी स्वीडीने नाबाद 48 चेंडूत 87 धावांची धमाकेदार खेळी केली. यात तिने 11 चौकार खेचले. मोजाम्बिक महिला गोलंदाजांनी 35 अतिरिक्त धावा दिल्या यात 30 वाइड चेंडूंचा समावेश होता.

हेही वाचा: US Open जिंकणाऱ्या १८ वर्षांच्या एमाबद्दल काही खास गोष्टी...

डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोजाम्बिकाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 12.5 षटकांच्या खेळात संपूर्ण संघ 28 धावांत आटोपला. संघातील एकाही खेळाडूला दुहेरी आकडा पार करता आला नाही. सलामीची फलंदाज पालमिरा क्यूनिका हिने संघाकडून सर्वाधिक 6 धावांची खेळी केली. टांझानियाच्या संघातील जलदगती गोलंदाज पिराइस कामुन्या हिने 6 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. नासरा सैदी आणि सोफिया जिरोम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेत तिला उत्तम साथ दिली.

हेही वाचा: पाचव्या कसोटीचा वाद; भारत-इंग्लंडचे माजी खेळाडू ट्विटरवर भिडले

महिला क्रिकेटमध्ये पाचव्यांदा एखाद्या संघाने टी-20 सामन्यात 200 पार धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. यात टांझानिया संघाने दोन वेळा 200 धावांचा टप्पा पार करुन 200 पेक्षा अधिक धावसंख्येच्या अंतराने विजय नोंदवला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम हा युगांडाच्या नावे आहे. 2019 मध्ये युंगाडा महिला संघाने माली विरुद्धच्या सामन्यात 304 धावांनी विजय नोंदवला होता. त्याच्यापाठोपाठ या यादीत बांगलादेश महिला संघाचा समावेश आहे. त्यांनी मालदीवला 249 धावांनी पराभूत केले आहे. रवांडा महिला संघानेही 216 धावांनी विजय नोंदवला आहे. त्यांनी मालीच्या संघाला मात दिली होती.

loading image
go to top