esakal | IND vs ENG: पाचव्या कसोटीचा वाद; भारत-इंग्लंडचे माजी खेळाडू ट्विटरवर भिडले
sakal

बोलून बातमी शोधा

Anderson-VIrat

पाचव्या कसोटीचा वाद; भारत-इंग्लंडचे माजी खेळाडू ट्विटरवर भिडले

sakal_logo
By
विराज भागवत

भारतीय खेळाडूंनी कसोटीला नकार दिल्यावर वाद चिघळण्याची चिन्हे

Ind vs Eng 5th Test Cancelled: इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारत चार सामन्यांनंतर २-१ने आघाडीवर होता. पण चौथ्या सामन्यादरम्यान प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा तर पाचव्या कसोटीआधी ज्युनियर फिजिओ योगेश परमार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खेळाडूंनी भीतीपोटी पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी भारतीय खेळाडूंच्या भूमिकेचे समर्थन केले. दुसरीकडे, ब्रिटीश क्रिकेट चाहत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली. याच दरम्यान, भारत आणि इंग्लंडचे माजी खेळाडू ट्वीटरवर भडकल्याचे दिसून आले.

हेही वाचा: IND vs ENG: वाद शमेना... इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं ICCला पत्र

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने सर्वात आधी एक ट्वीट केले. IPL च्या टीम आपापली विमानं पाठवून खेळाडूंना घेऊन जात आहेत. युएईमध्ये ६ दिवसांचे क्वारंटाइन सक्तीचे आहे. आता स्पर्धा सुरू व्हायला सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मला कोणीही समजावण्याचा प्रयत्न करू नये की भारतीय खेळाडूंनी IPL सोडून कोणत्या तरी इतर कारणामुळे सामना खेळण्यास नकार दिला.

हेही वाचा: IND vs ENG मालिकेमध्ये भारताने काय कमावलं? जाडेजा म्हणतो...

त्यावर, भारताचा माजी फलंदाज आणि सध्याचा प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने उत्तर दिले. इंग्लंड संघाने काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दौरा कोविडच्या भीतीपोटी रद्द केला होता. त्यालाच कोविडमुळे तयार होणारी असुरक्षितता म्हणतात, असं ट्वीट आकाश चोप्राने केलं. त्यावर लगेचच, मायकल वॉननेही पुन्हा उत्तर दिलं. "इंग्लंडचा तेव्हाचा मालिका रद्द करण्याचा निर्णय मला पटलेला नव्हता आणि तसाच आजही भारताचा सामना रद्द करण्याचा निर्णय मला पटलेला नाही", असं रोखठोक ट्वीट त्याने केलं.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं ICC ला पत्र

पाचवी कसोटी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली. ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला वेगळाच रंग दिला. IPL ला अधिक महत्त्व देण्याच्या उद्देशाने खेळाडूंनी ही कसोटी रद्द करायला लावली असा आरोपच त्यांनी केला. या दरम्यान, BCCI ने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला हा सामना पुन्हा काही काळाने आयोजित करा असं सांगितलं होतं. पण इंग्लंड-भारत क्रिकेट बोर्डातील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. तशातच आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने थेट ICCला पत्र लिहिल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

loading image
go to top