T20 WC - पाकच्या पराभवानंतर अख्तरला शब्द सुचेनात; पाहा VIDEO | Aus Vs Pak | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 WC - पाकच्या पराभवानंतर अख्तरला शब्द सुचेनात; पाहा VIDEO

पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे.

T20 WC - पाकच्या पराभवानंतर अख्तरला शब्द सुचेनात; पाहा VIDEO

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टी २० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. एकवेळ सामना पाकिस्तानच्या बाजुने असताना मॅथ्यु वेडने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन केले. त्याच्यासोबत मार्कस स्टॉइनिसने फटकेबाजी करत विजय मिळवून दिला. दरम्यान, या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. अख्तरने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात काय बोलावं हेच त्याला सुचत नसल्याचं दिसत आहे.

शोएब अख्तर सुरुवातीपासून पाकिस्तानच्या संघाला पाठिंबा देताना यंदा अंतिम फेरीत जाणार असं सतत म्हणत होता. मात्र संघाला सेमिफायनलमधून गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानला २० धावा कमी पडल्या. मधल्या षटकांमध्ये त्यांचा धावांचा वेग मंदावला. सर्वांचे हृदय तुटलं असून मी निराश झालोय अशा भावना शोएब अख्तरने व्यक्त केल्या. वर्ल्ड कप आमचा होता आणि त्यातून आपण शिकलं पाहिजे असंही शोएब म्हणाला.

पाकिस्तानचा पराभव दुर्दैवी आहे असं म्हणताना त्याने आपण हरलो नाही असंही म्हटलं आहे. तुम्ही पाकिस्तानची साथ सोडू नका, खूप छान खेळला. ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट खेळ केला हे आपण मान्य करायला हवं. पण सोशल मीडियावर पाकिस्तानला पाठिंबा द्यायला हवा असेही आवाहन शोएब अख्तरने केले आहे.

हेही वाचा: Bye Bye Pakistan ट्विटरवर ट्रेंडिंग.. पाहा भन्नाट विनोदी मीम्स

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात संथ झाली. त्यातच फिंच, स्मिथ, मॅक्सवेल हे लवकर बाद झाले. त्यानतंर डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून विजय मिळवला.

loading image
go to top