IPL मध्ये सुस्तावलेल्या वाघाची T20 World Cup मध्ये डरकाळी! |David Warner Comeback News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

David Warner
IPL मध्ये सुस्तावलेल्या वाघाची T20 World Cup मध्ये डरकाळी!

IPL मध्ये सुस्तावलेल्या वाघाची T20 World Cup मध्ये डरकाळी!

युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आपले तेवर दाखवून दिले. 2010 मध्ये मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचला होता. पण यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या हंगामात फिंचच्या नेतृत्वाखाली अखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. आयपीएलमध्ये फेल ठरलेला आणि ऑस्ट्रेलियन संघातील सर्वाधिक वय असलेला गडी ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरला.

हो...हा तोच हिरो आहे जो आयपीएलमध्ये झिरो ठरला अन् कॅप्टन्सीवरुन हटवल्यानंतर काही सामन्यात वॉटर बॉयच्या भूमिकेत मैदानात शिरताना दिसले. आयपीएलमध्ये एका-एका धावेसाठी संघर्ष करणाऱ्या डेविड वॉर्नरला टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात जागे मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. स्पर्धेपूर्वी वॉर्नर नुसता संघात असणार नाही तर तो डावाची सुरुवात करेल, असे ठाम वक्तव्य फिंचनं केलं. वॉर्नरनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

हेही वाचा: भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा

युएईच्या मैदानात रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन संघ सर्वाधिक यंगिस्तान होते. संघातील खेळाडूंचे सरासरी वय हे जवळपास 26.53 च्या घरात होते. जर वयोवृद्ध संघाचा विचार केल्यास इंग्लंडचा संघातील खेळाडूंचे सरासरी वय हे 31.33 च्या घरात होते. वेस्ट इंडीजच्या संघात गेल 42 वर्षे, पाकिस्तानचा मोहम्मद हाफिझ 41 आणि शोएब मलिक 39 वर्षे असताना खेळताना दिसले.

हेही वाचा: भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा

डेविड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू होता. पस्तीशी पार केलेल्या या खेळाडूने आपल्या भात्यात आजही फटकेबाजी करण्याची ताकद असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियन संघात जोश इंग्लिस हा सर्वात यंग खेळाडू 26 वर्षांचा होता. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली नाही. त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा असलेला वॉर्नर प्रत्येक सामन्यात खेळला आणि आपल्या योगदानाच्या जोरावर त्याने संघाला जेतेपदही मिळवून दिले. स्पर्धेतील दमदार कामगिरीसह त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावत आपल्यात अजूनही क्रिकेट बाकी असल्याचे दाखवून दिले आहे.

loading image
go to top