New Zealand Coach Reaction | भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Kane-Williamson

IND vs NZ : न्यूझीलंडची १७ नोव्हेंबरपासून भारताविरोधात क्रिकेट मालिका

भारत दौऱ्याआधीच न्यूझीलंडला भरली धडकी; कोच काय म्हणाले वाचा

IND vs NZ : न्यूझीलंडच्या संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गडी राखून धूळ चारली. या स्पर्धेनंतर आता न्यूझीलंडचा संघ १७ नोव्हेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंत भारत दौऱ्यावर असणार आहे. या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेआधीच न्यूझीलंडला धडकी भरल्याचं चित्र असून तशा पद्धतीचे मत त्यांचे प्रशिक्षक गॅरी स्टेड्स यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: T20 WC: बाबरचं 'त्रिशतक' पाण्यात; वॉर्नर ठरला मॅन ऑफ द सीरीज!

Virat-Kohli-Team-India

Virat-Kohli-Team-India

"असं पहिल्यांदाच घडतंय की आम्ही एक स्पर्धा संपवून लगेच दुसऱ्या क्रिकेट मालिकेत खेळणार आहोत. वर्ल्ड कपच्या स्पर्धेत खेळल्यानंतर लगेचच क्रिकेट मालिका खेळणं हे खूप कठीण आणि १आव्हानात्मक असणार आहे. पण क्रिकेटचा तसा कार्यक्रम आखला असल्याने मालिका खेळण्यास आम्ही सज्ज असणं आवश्यक आहे. आम्ही कसोटी मालिकेसाठी आमचे ९-१० खेळाडू आधीच भारतात पाठवले होते. ते सध्या तेथे सराव करत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे", असे न्यूझीलंडचे कोच म्हणाले.

हेही वाचा: IND VS NZ : कसोटी खेळाडूंचे आजपासून मुंबईत सराव

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त झाला होता. त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. "लॉकी फर्ग्युसन हा लवकरच तंदुरूस्त होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत आहोत. तो भारताविरूद्धच्या मालिकेसाठी नक्कीत तयार असेल अशी मला आशा आहे", असेही ते म्हणाले.

हेही वाचा: "खूप चुकीचं आहे"; वॉर्नर मालिकावीर अन् अख्तरचं जळजळीत विधान

हेही वाचा: IND vs NZ Test : वानखेडे स्टेडियवर 100 टक्के एन्ट्री; राज्य सरकारनं दिली परवानगी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी दिली होती. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने संथगतीने २८ धावा केल्या. इतर कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही. पण केन विल्यमसनने कर्णधारपदाला साजेशी ४८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली आणि संघाला १७२ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून आधी डेव्हिड वॉर्नरने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ५३ धावा केल्या. त मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला पहिला टी२० विश्वचषक मिळवून दिला.

loading image
go to top