T 20 WC : तालिबानकडून अफगाणिस्तानच्या खेळाडूंना धमकी

क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या तालिबानला संघातील खेळाडूंची ही गोष्ट खटकली
Afghanistan Cricket Team
Afghanistan Cricket TeamSakal

T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने दमदार सुरुवात केलीये. सलामीच्या लढतीत त्यांनी स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात 130 धावांनी दमदार विजय नोंदवला होता. या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु असताना अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही गोष्ट अफगाणिस्तानमध्ये राज्य प्रस्थापित केलेल्या आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या तालिबानला पटलेली नाही. त्यामुळेच तालिबान्यांनी खेळाडूंना ताकीद दिली आहे. क्रिकेटच्या मैदानात उतरताना भावना नियंत्रणात ठेवा, असे संघातील खेळाडूंना बजावण्यात आले आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज्य आल्यामुळे अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज बदलण्यात आला आहे. एवढेच नाही तर देशात राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भातही निर्बंध आहेत. ज्यावेळी जुने राष्ट्रगीत खेळाडूंच्या कानावर पडले त्यावेळी खेळाडूंना भरु आले. काही खेळाडूंच्या डोळ्यात अश्रूही दिसून आले. या भावना आवरा, असे तालिबानने खेळाडूंना सांगितले आहे.

Afghanistan Cricket Team
T20 WC : गत चॅम्पियन अखेर जिंकला, पूरन ठरला हिरो!

न्यूज 9 च्या वृत्तानुसार, तालिबानकडून मिळालेल्या आदेशानंतर खेळाडूंनी एक बैठक घेतली. या बैठकीत भावनेला आवर घालून खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय संघातील खेळाडूंनी घेतल्याचे बोलले जात आहे. अफगाणिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळत आहे.

Afghanistan Cricket Team
Video: अजब गजब रन आऊट... रसल झाला हैराण; तुम्हीही एकदा पाहाच

अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मोहम्मबद नबीने कर्णधाराला साजेसा खेळ करत 35 धावांची नाबाद खेळी केली. त्याला गुल्बदीन याने उत्तम साथ देत 25 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com