IND vs PAK : टीम इंडियाच्या पराभवामागची 5 कारण...

पण यावेळी त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आत्मविश्वासाने खेळ केला.
India vs Pakistan
India vs PakistanSakal

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या रेकॉर्डचा फुगा फुटला अन् टीम इंडियाला सलामीच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. प्रत्येक सामना नवीन चॅलेंज असतो याची अनुभूती दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाहायला मिळाली. प्रत्येक वर्ल्ड कप स्पर्धेत चाचपडत खेळणारा पाकिस्तानचा संघाने 2017 च्या आयसीसी चॅम्पियनशिपच्या फायनलची आठवण करुन देत टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर पराभूत करुन दाखवले. भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत ही अतिरिक्त दबाव निर्माण करणारी असते. यापूर्वी पाकिस्तान नेहमी दबात खेळताना दिसले होते. पण यावेळी त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आत्मविश्वासाने खेळ केला. हीच त्यांच्या विजयाची गुरुकिल्ली ठरली. जाणून घेऊयात भारतीय संघाच्या पराभवामागची प्रमुख पाच कारणे....

सलामीच्या जोडीचा फ्लॉप शो

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ही जोडी भारताची सुपर डुपर हिट जोडी आहे. या दोघांनी अनेक सामन्यात दमदार सुरुवात करुन देत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ही जोडी स्वस्तात आटोपली. दोघातील एकालाही मैदानात तग धरता आला नाही. ही बाब भारतीय संघाच्या पराभवास कारणीभूत ठरली.

India vs Pakistan
IND vs PAK : धमाकेदार विजयानंतर बाबर म्हणाला, हा फक्त ट्रेलर!

शाहीन आफ्रिदीनं संघाला दिला आत्मविश्वास

भारतीय सलामी जोडी दबावात खेळली असे मुळीच नाही. पण रोहित आणि लोकेश राहुल ज्या चेंडूवर बाद झाले ते दोन्ही चेंडू सर्वोत्तम होते. त्यामुळे या दोन्ही विकेट्सच श्रेय हे शाहीन आफ्रिदीलाच जाते. त्याच्या भेदक माऱ्याने पाकिस्तानला आत्मविश्वास मिळाला. इतर गोलंदाजांनीही त्याला लाभ उठवत विराट कोहीली एका बाजूनं खिंड लढवत असताना त्यांनी दुसऱ्या बाजूनं खिंडार पाडले. त्यामुळे टीम इंडियाला माफक धावात रोखण्यात पाकिस्तानच्या संघाला यश आले.

बाबर-रिझवानचा हिट शो

टीम इंडियाला माफक धावांत रोखल्यानंतर पाकिस्तानच्या सलामी जोडीने कोणताही दबाव न घेता नैसर्गिक खेळ दाखवला. शांत डोक्याने त्यांनी भागीदारी पुढे सरकवत संघाला मोठा विजय मिळवून दिला. या दोघांच्या खेळीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांचे खांते पाडले. त्यांना कोणत्याही प्रकार त्यांच्यावर लगाम लावता आला नाही.

India vs Pakistan
IND vs PAK पाकिस्तानने इतिहास बदलला! टीम इंडियावर पराभवाची नामुष्की

बुमराहऐवजी-भुवीचे आक्रमण

सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत भारतीय संघाने समाधानकारक धावसंख्या उभारली होती. पण एकाही गोलंदाजाला सलामी जोडी फोडून पाकिस्तानला दबावात टाकणे जमले नाही. अनुभवी भुवनेश्वर कुमारने पुन्हा निराश केले. तो संघर्ष करत असताना कोहलीने पहिले षटक टाकण्यासाठी त्याची निवड केली. त्याच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानच्या सलामी जोडीने 10 धावा कुटल्या. इथ त्यांचा आत्मविश्वास उंचावला. बुमराहकरवी मारा करण टीम इंडियासाठी फायद्याचे ठरले असते. त्यानंतर गोलंदाजांना संधीच निर्माण करता आली नाही.

टॉस गमावला तिथेच मॅच पाकिस्तानच्या बाजूनं झुकली

दुबईच्या मैदानात नाणेफेक जिंकणे खूप महत्त्वाचे होते. जो संघ टॉस जिंकेल तो पहिल्यांदा गोलंदाजी करणार हे पक्के होते. रात्रीच्या सत्रातील सामन्यात दवामुळे खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल राहिल, असा अंदाज होता. झालेही तेच. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या डावात अजिबाद मदत मिळाली नाही. बाबर आझमने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com