IND vs USA : शिवम दुबे OUT, 'या' खेळाडूला मिळणार संधी... अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित करणार मोठा बदल?

IND vs USA T20 World Cup 2024 Playing XI : यंदाच्या वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिले दोन सामने जिंकले आहेत.
T20 World Cup 2024 India vs United States Playing XI
T20 World Cup 2024 India vs United States Playing XIsakal

T20 World Cup 2024 India vs United States Playing XI : यंदाच्या वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिले दोन सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला.

आता भारतीय संघाला 12 जून रोजी सह-यजमान यूएसए विरुद्ध तिसरा लीग सामना खेळायचा आहे. टी-20 च्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील.

T20 World Cup 2024 India vs United States Playing XI
T20 World Cup 2024 Super-8 : वर्ल्ड कपधून 1 टीम बाहेर; चॅम्पियन्स इंग्लंड, पाकिस्तानसह 'या' 10 संघांवर आता टांगती तलवार

सध्या दोन्ही संघांनी आपले पहिले दोन सामने जिंकून 4-4 गुण मिळवले आहेत आणि नेट रन रेटच्या आधारे भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर यूएसए दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून सुपर 8 मध्ये जाण्याचा दावा मजबूत करतील.

जर दोन्ही देशांमधील हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि अशा स्थितीत पाकिस्तानचा संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडेल. पण या सामन्यात टीम जिंकण्याची शकता जास्त आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.

शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?

आता मागील दोन सामने जिंकणारी टीम इंडिया अमेरिकेविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकते का, हा प्रश्न आहे. तशी शक्यता कमी वाटत असली तरी भारताने जर काही बदल केले तर कदाचित खराब फॉर्म असलेल्या शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

जर दुबे संघाबाहेर गेला तर संजू सॅमसन किंवा यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते.

T20 World Cup 2024 India vs United States Playing XI
PAK vs CAN : पाकच्या स्वप्नावर अवकाळी पाऊस घालणार खोडा? कॅनडाविरुद्ध मॅचआधी न्यूयॉर्कमधून मोठी अपडेट

यशस्वीला मिळणार संधी?

यूएसएविरुद्ध दुबेला वगळून यशस्वी जैस्वालचा संघात समावेश केला जाऊ शकतो. जर तो संघात आला तर तो रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल. कारण विराट कोहली गेल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. पहिल्या सामन्यात तो आयर्लंडविरुद्ध एक धावा काढल्यानंतर आणि पाकिस्तानविरुद्ध 4 धावा केल्यानंतर बाद झाला होता.

तरी सध्या तरी संजू सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे. यशस्वीची एंट्री झाल्यास कोहली त्याच्या जुन्या स्थानावर म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि यशस्वीच्या आगमनाने भारताला डावे-उजवे कॉम्बिनेशन मिळेल.

T20 World Cup 2024 India vs United States Playing XI
T20 WC Pakistan Scenarios : पाकिस्तान संघ थाटात मारणार सुपर-8 मध्ये एंन्ट्री, पण कशी? जाणून घ्या 'ग्रुप A'चे समीकरण

बॉलिंग युनिटमध्ये होणार नाही कोणताही बदल

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत असून हार्दिक पांड्याही त्यांना साथ देत आहे, त्यामुळे हे सर्वजण संघात राहतील. अक्षर पटेलने स्वत:ला सिद्ध केले असले तरी रवींद्र जडेजाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. पाकिस्तानविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता नाही. या स्थितीत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना प्रतीक्षा करावी लागू शकते.

अमेरिकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com