T20 WC: मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्या फॅन्सना सचिनने सुनावलं

काही फॅन्सनी शमीच्या देशभक्तीवर संशय घेत टीका केली
Sachin-Tendulkar-Mohd-Shami
Sachin-Tendulkar-Mohd-Shami
Summary

काही फॅन्सनी शमीच्या देशभक्तीवर संशय घेत टीका केली

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाला पाकिस्तानविरूद्ध सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने टीम इंडियाला १० गडी राखून पराभूत केले. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) या दोघांशिवाय इतर खेळाडू फारसे चांगली कामगिरी करू शकले नाहीत. सामन्यात भारताला पाकिस्तानचा एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यावरून काही फॅन्सनी मोहम्मद शमीवर टीका केली. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र त्या चाहत्यांना सुनावलं.

Sachin-Tendulkar-Mohd-Shami
T20 WC: भारताच्या पराभवानंतर आमिरने उडवली हरभजनची खिल्ली

भारतीय संघाच्या एकाही गोलंदाजाला पाकिस्तानची विकेट घेता आली नाही. त्यानंतर काही फॅन्सनी मोहम्मद शमीवर टीका केली. त्याच्या धर्मावरून त्याला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. तसेच, शमी हा देशाप्रति प्रामाणिक नसल्याचेही काही फॅन्सनी म्हटले. या साऱ्यांना सचिनने चांगलंच सुनावलं.

"जेव्हा आपण टीम इंडियाला पाठिंबा देत असतो, त्यावेळी आपण टीम इंडियाकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आपला पाठिंबा द्यायला हवा. मोहम्मद शमी हा एक जागतिक किर्तीचा प्रतिभावान गोलंदाज आहे. त्याची देशाप्रति निष्ठा त्याने वेळोवेळी सिद्ध केली आहे. एखादा दिवस एखाद्या खेळाडूसाठी चांगला जात नाही. पण त्याच्यावर अशी टीका करणं योग्य नाही. माझा मोहम्मद शमी आणि टीम इंडियाला संपूर्ण पाठिंबा आहे", असं ट्वीट सचिनने केलं.

Sachin-Tendulkar-Mohd-Shami
T20 WC IND vs PAK : "शाब्बास पाकिस्तान, यालाच म्हणतात..."

दरम्यान, विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच सामना संपवला. रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा कुटल्या. तर बाबर आझमने ५२ चेंडूत नाबाद ६८ धावा करत त्याला सुयोग्य साथ दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com