T20 WC: भारताच्या पराभवानंतर मोहम्मद आमिरने उडवली हरभजनची खिल्ली | IND vs PAK | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohd-Amir-Harbhajan-Singh

IND vs PAK: मोहम्मद आमिर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज

T20 WC: भारताच्या पराभवानंतर आमिरने उडवली हरभजनची खिल्ली

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच एकही गडी बाद न होऊ देता सहज पार केलं. पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याची खिल्ली उडवली.

हेही वाचा: T20 WC: 'मारो मुझे मारो'वाल्या फॅनचा नवा Video झाला व्हायरल

भारताचा पाकिस्तानकडून दारूण पराभव झाल्यानंतर सुरूवातीला शोएब अख्तरने हरभजनची टिंगल केली. शोएब अख्तरने हरभजनला पाकच्या विजयांनंतर वॉकओव्हरवरून हिणवलं. पण मोहम्मद आमिरने तर हरभजनला एक प्रश्न विचारत त्याची मस्करी केली. भारत पराभूत झाल्यानंतर हरभजन सिंग पाजींनी त्यांच्या घरचा टीव्ही फोडला की नाही, हे मला विचारायचं आहे, असा प्रश्न त्याने विचारला. मात्र, त्याच ट्वीटमध्ये, हा फक्त क्रिकेटचा खेळ आहे, असं म्हणत हरभजन आणि भारतीयांचं सांत्वनही केलं.

आता हरभजन या ट्विटला रिप्लाय देतो की नाही, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

हेही वाचा: IND vs PAK पाकिस्तानने इतिहास बदलला! टीम इंडियावर पराभवाची नामुष्की

दरम्यान, विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच सामना संपवला. रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा कुटल्या. तर बाबर आझमने ५२ चेंडूत नाबाद ६८ धावा करत त्याला सुयोग्य साथ दिली.

Web Title: Pakistani Pacer Mohammad Amir Teases Indian Spinner Harbhajan Over Tv Break In Ind Vs Pak T20 Wc Match Vjb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top