Jasprit Bumrah | T20 World Cup 2024
Jasprit Bumrah | T20 World Cup 2024Sakal

T20 World Cup जिंकल्यानंतर आठवड्याने बुमराहने शेअर केला विराटच्या आवजातील 42 सेंकदाचा Video; कॅप्शननेही जिंकली मनं

Jasprit Bumrah Post: जसप्रीत बुमराहने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात विराटच्या भाषणाचा आवाज आहे.

Jasprit Bumrah Video Post: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा भारतीय संघाने जिंकत मोठा कारनामा केला आहे. २९ जून रोजी भारतीय संघाने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला. हा भारताचा दुसरा टी२० वर्ल्ड कप विजय आहे.

तसेच तब्बल ११ वर्षांनी भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे भारताच्या या विजयाचा आनंद गेल्या आठवड्याभरापासून साजरा होत आहे. आता जवळपास आठवडाभराने जसप्रीत बुमराहने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. बुमराहने या स्पर्धेत ८ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले होते.

Jasprit Bumrah | T20 World Cup 2024
Jasprit Bumrah: टी20 वर्ल्ड कप विजयानंतर पत्नीकडून बुमराहला मिळाली खास ट्रीट, पाहा Video

दरम्यान, या विश्वविजयानंतर भारतीय संघ बार्बाडोसमध्ये आलेल्या वादळामुळे तीन दिवस तिथेच अडकला होता. त्यानंतर ४ जुलै रोजी भारतीय संघ पहाटे मायदेशी परतला. मायदेशात आल्यानंतर दिल्लीत विश्वविजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा झाली.

यानंतर भारतीय संघ त्याचदिवशी संध्याकाळी मुंबईत परतल्यानंतर मरिन ड्राईव्हवर त्यांची ओपन बसमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी मरिन ड्राईव्हवर गर्दी केली होती. यानंतर वानखेडे स्टे़डियमवर भारतीय संघाचा बीसीसीआयकडून गौरव करण्यात आला.

हा संपूर्ण प्रवास दाखवणारा ४२ सेकंदाचा व्हिडिओ जसप्रीत बुमराहने शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीने त्याच्या भाषणात बुमराहचे कौतुक करतानाचा आवाज ऐकू येत आहे.

Jasprit Bumrah | T20 World Cup 2024
Virat Kohli: वानखेडे स्टेडियमवरील सेलीब्रेशनवेळी 'वंदे मातरम' म्हणण्याची कल्पना होती विराट कोहलीची? Video होतोय व्हायरल

विराट बुमराहबद्दल म्हणाला होता,'मी सर्वांना एकच सांगेल की त्या व्यक्तीसाठी टाळ्या वाजवा, ज्याने आपल्याला सामन्यात आणि स्पर्धेत पुन्हा-पुन्हा परत आणले. तो शेवटत्या पाच षटकातील दोन षटके अफलातून टाकतो. एका युगात असा एकच खेळाडू असतो.'

बुमराहने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'गेल्या काही दिवसांसाठी मी कृतज्ञ आहे. मी माझं स्वप्न जगत आहे आणि यामुळे मी आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून गेलो आहे.'

बुमराहने अनेकदा अखेरच्या षटकांमध्ये धावा रोखण्याबरोबर महत्त्वाच्या विकेट्स काढत भारताच्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला होता.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com