Kane Williamson Dropped Catch | Video : विल्यमसनचा एक कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला पडलं भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kane-Williamson-Dropped-Catch

विल्यमसन २२ धावांवर खेळत असताना सुटला होता झेल

Video : विल्यमसनचा एक कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला पडलं भारी

sakal_logo
By
विराज भागवत

NZ vs AUS, T20 World Cup Final: न्यूझीलंडविरूद्ध टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्या १० षटकात सामना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या हातात होता, पण त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी डावाला गती दिली. तशातच कर्णधार केन विल्यमसनचा झेल सोडणं ऑस्ट्रेलियाला चांगलंच महागात पडलं.

हेही वाचा: AUS vs NZ: मास्टर ब्लास्टर सचिननं किवींना केलं सावध; म्हणाला...

कर्णधार केन विल्यमसन २१ चेंडूत २१ धावांवर खेळत होता. त्यावेळी मिचेल स्टार्कने विल्यमसनला पायांवर फुल टॉस चेंडू टाकला. विल्यमसनने त्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवला. चेंडू हवेत वेगाने गेला पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या जोश हेजलवूडने त्याचा झेल सोडला. चेंडू त्याच्या हातावरून लागून थेट सीमारेषेच्या पार चौकार गेला.

पाहा हेजलवूडने सोडलेला झेल-

हेही वाचा: NZ vs AUS Final: सुनील गावसकर म्हणतात, "हाच संघ जिंकणार"

तो झेल सुटणं ऑस्ट्रेलियाला चांगलंच महागात पडलं. कारण तो झेल सुटल्यामुळे त्या चेंडूवर चौकार गेलाच. पण त्यानंतर पुढील दोन चेंडूवरही विल्यमसनने दमदार चौकार लगावले आणि डावाला गती दिली. हीच गती पुढे चालू ठेवत विल्यमसनने ३२ चेंडूत आपलं धडाकेबाज अर्धशतकही पूर्ण केलं. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार खेचत विल्यमसनने आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेर झेल सोडल्यावर एकूण ६५ धावांची भर घालून विल्यमसन बाद झाला. त्याने ४८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८७ धावा कुटल्या.

loading image
go to top