T20 WC Final, AUS vs NZ: मास्टर ब्लास्टर सचिननं किवींना केलं सावध; म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

new zealand
T20 WC Final, AUS vs NZ: मास्टर ब्लास्टर सचिननं किवींना केलं सावध; म्हणाला...

AUS vs NZ: मास्टर ब्लास्टर सचिननं किवींना केलं सावध; म्हणाला...

टी 20‌ वर्ल्ड कप 2021 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने भिडणार आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता असेल. दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदा जेतेपद पटकवण्यासाठी उत्सुक असतील.

दुबईच्या मैदानात रंगणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ऑस्ट्रेलियन फिरकीपटूवर स्तुती सुमनांचा वर्षावर केला आहे. अ‍ॅडम झम्पा हा फलंदाजाची मुव्हमेंट पाहून बॉल रिलीज करतो. सध्याच्या घडीला तो फार्मात असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा: टी२० वर्ल्डकप फायनलचा थरार; काय महत्त्वाचे

सचिन तेंडुलकरने फेसबुकच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने झम्पाच्या गोलंदाजीवर भाष्य केलं आहे. तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे ते कमालीचे आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मुव्ह कॅच करुन तो बॉल रिलीज करताना पाहायला मिळाले. ही गोष्ट तो लयीत असल्याचे संकेत देणारी आहे. त्याच्या गोलंदाजीवर प्रहार करणे सहज सोपे नाही, असेही तेंडुलकरने म्हटले आहे. तेंडुलकरने या व्हिडिओमध्ये झम्पाच्या गोलंदाजीचे बारकावे सांगत किवींना एकप्रकारे सावधच केले आहे.

हेही वाचा: सानिया म्हणते, नवऱ्याला माजी फिकीरच नाही; व्हिडिओ व्हायरल

सहा सामन्यात 12 विकेट घेणारा झम्पा स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या वानिंदु हसारंगाने सर्वाधिक 16 विकेट घेतल्या आहेत. झम्पाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 19 धावा खर्च करुन पाच विकेट घेतल्या होत्या. टी-20 कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.

loading image
go to top