Virat Kohli
Virat KohliSakal

Virat Kohli: 'विराटने सलामीला फलंदाजी करावी, नाहीतर माझ्या संघात खेळूच नये', टीम इंडियाबद्दल बोलताना असं कोण म्हणालं?

Virat Kohli as Opener: विराट कोहलीने टी20 वर्ल्ड कपमध्ये सलामीला फलंदाजी करावी की नाही, यावर नुकतेच दिग्गज क्रिकेटपटूने रोखठोक मत मांडले आहे.

India Cricket Team: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे सुरुवात झाली आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपली मोहिम 5 जून रोजी सुरू करणार आहे. पण त्याआधी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधील संयोजनाबाबत सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

त्यातही स्टार फलंदाज विराट कोहलीने सलामीला फलंदाजी करावी की नाही, यावरही अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

विराटला टी20 क्रिकेटमध्ये सलामीला आणि तिसऱ्या क्रमांकावरही खेळताना चांगले यश मिळाले आहे. तसेच आयपीएल 2024 मध्येही त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीला खेळताना दमदार कामगिरी करत ऑरेंज कॅप पटकावली आहे.

त्याचमुळे आता तो या टी20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, हा चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने म्हटले आहे की विराटने सलामीला फलंदाजी करावी, त्याचबरोबर डावे-उजवे संमिश्रणही महत्त्वाचे असल्याने हेडनने म्हटले आहे.

Virat Kohli
T20 World Cup: तब्बल 12 वर्षांनी सुपर-ओव्हर! ओमान-नामिबियापूर्वी यापूर्वी 'हे' तीन सामनेही झालेत 'टाय'

हेडन इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, 'तुमच्याकडे डावे-उजवे संमिश्रण हवे, तुमच्या संघात सलग 5 उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज असू शकत नाहीत. नाहीतर मग ऑस्ट्रेलिया लगेचच ऍडम झाम्पाचा वापर करू शकतात.'

'कोहलीने सलामीला फलंदाजी करायला पाहिजे, नाहीतर तो माझ्या संघात नसेल. तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रोहितकडे विविधता असलेला खेळाडू आहे आणि मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी त्याने कमीपणा समजू नये. त्याचा टी20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावरही चांगला रेकॉर्ड होता. तो मधल्या फळीचे चांगले नेतृत्व करू शकेल.'

सध्या भारताकडे सलामीसाठी रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली हे पर्याय आहे, ज्यांची चर्चा होत आहे.

Virat Kohli
T20 World Cup: सुपर ओव्हर रंगलेल्या ओमान-नामिबिया सामन्यात रचला गेला इतिहास; यापूर्वी T20I मध्ये असं कधीच झालं नव्हतं

तसेच विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे, त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 741 धावा केल्या होत्या.

तसेच विराटने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सलामीला फलंदाजी करताच्या आकडेवारीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 9 सामन्यात सलामीला फलंदाजी केली असून 400 धावा केल्या आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक 80 सामन्यात फलंदाजी केली असून 3076 धावा केल्या आहेत.

रोहितने सलामीला 117 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात फलंदाजी केली असून 3493 धावा केल्या आहेत. तसेच त्याने मधल्या फळीत त्याने 31 सामने खेळले असून 23 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com