पांढरी दाढी... डोळ्यावर गॉगल; पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी वेशांतर करून आला MS धोनी? मीम्स Viral

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहयजमान अमेरिका संघाने माजी विजेत्या पाकिस्तानचा सुपरओव्हरमध्ये पराभव करत पहिला धक्कादायक आणि थरारक विजय मिळवला.
MS Dhoni doppelganger goes viral at Pak vs USA T20 World Cup
MS Dhoni doppelganger goes viral at Pak vs USA T20 World Cupsakal

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहयजमान अमेरिका संघाने माजी विजेत्या पाकिस्तानचा सुपरओव्हरमध्ये पराभव करत पहिला धक्कादायक आणि थरारक विजय मिळवला. युनायटेड स्टेट्सने सुपर ओव्हरमध्ये पाच गडी राखून विजय मिळवला. सामन्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीम्सचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आणि अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमच्या संघाला टीकेला सामोरे जावे लागले आहे.

MS Dhoni doppelganger goes viral at Pak vs USA T20 World Cup
Ind Vs Pak Playing-11 : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय; पाकिस्तानविरुद्ध 'या' प्लेइंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अमेरिका आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आला होता, तो पण वेशांतर करून अशी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या फोटोत एमएस धोनी प्रेक्षकांमध्ये बसला आहे, आणि लांब दाढी, पांढरा कुर्ता आणि स्टायलिश सनग्लासेस घातलेला दिसत आहे. पण खरं तर, तो धोनी नसून सोशल मीडिया नेटकऱ्यांनी मीम्स पोस्ट तयार केली आहे. यासोबत खरा फोटो पण समोर आला आहे. ज्यामध्ये दुसरा व्यक्ती दिसत आहे.

MS Dhoni doppelganger goes viral at Pak vs USA T20 World Cup
India vs USA : पाकला हरवणाऱ्या मुंबईकर सौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान! पुन्हा ठरणार अमेरिकेचा 'हिरो'?

त्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद रिझवानला दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्याला आऊट करत सौरव नैत्रावलकरने अमेरिका संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. त्यानंतर केंजिगे याने उस्मान खानला माघारी धाडल्यामुळे पाकची सुरुवात 2 बाद 14 अशी झाली होती.

फखर झमानही फार काही करु शकला नाही. त्यामुळे 3 बाद 26 अशा संकटात सापडलेल्या पाकचा डाव कर्णधार बाबर आझम आणि शादाब खान यांनी सावरला. त्याच्यामुळे संघाला 159 धावापर्यंत मजल मारता आली.

MS Dhoni doppelganger goes viral at Pak vs USA T20 World Cup
NZ vs AFG : टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने न्यूझीलंड संघाला दिला मोठा धक्का; रशीदचा कहर

160 धावांचा पाठलाग करताना अमेरिकेला कर्णधार मोनाक पटेल आणि अँड्रिस गस यांनी 48 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अँड्रिस गस आणि नितीश कुमार यांनी किल्ला लढवला, यात अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना नितीशने चौकार मारून सामना टाय केला.

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 18 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकला 13 धावाच करता आल्या. मुळ मुंबईकर सौरव नेत्रावलकरने अमेरिका संघातून सुपर ओव्हरमध्ये 13 धावा देत एक फलंदाज बाद केला. याच सुपरओवहरमध्ये फलंदाजीत अमेरिका संघातून अॅरॉन जोन्सने 11 धावा ठोकल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com