Pakistan Lost in T20 World Cup | Video: पाकिस्तान हारल्यावर चिमुरडा TV फोडाणरच होता पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pak-TV-Break

ऑस्ट्रेलिया विजयी झाल्यावर त्याला अक्षरश: रडू कोसळलं

Video: पाकिस्तान हारल्यावर चिमुरडा TV फोडाणरच होता पण...

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs PAK: पाकिस्तानचा टी२० वर्ल्डकपचा प्रवास उपांत्य फेरीत संपला. सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ चेंडू राखून पाकला पराभूत केले. पाकिस्तानने २० षटकांत १७६ धावा ठोकल्या होत्या. हे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाला शेवटच्या २ षटकांत २०पेक्षाही जास्त धावा हव्या होत्या. त्यावेळी हसन अलीने मॅथ्यू वेडचा एक झेल सोडला आणि त्यानंतर तीन चेंडूत तीन सिक्सर लगावत वेडने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकला. पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर फॅन्सना दु:ख झालंच पण एका चिमुरड्याला तर अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Bye Bye Pakistan ट्विटरवर ट्रेंडिंग.. पाहा भन्नाट विनोदी मीम्स

पाकिस्तानच्या संघाचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या एका चिमुरड्याला तो पराभव पचवणं खूपच अवघड गेलं. सामना गमावल्यानंतर तो अक्षरश: ओक्साबोक्शी रडू लागला. त्याच्यासोबत त्याचे वडील आणि काही कुटुंबीयदेखील सामना पाहत होते. त्याला रडताना पाहून त्यांना त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला हारण्याचं दु:ख अनावरच झालं. पाकिस्तान हारल्याने त्याला रागदेखील आलाच होता. त्या रागाच्या भरात चिमुरडा टीव्हीवर फटका मारणारच होता. पण त्याला त्याच्या वडिलांनी रोखलं. त्यानंतरही तो खूप रडतच होता. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या व्हिडीओ शेअर केला आहे. चांगला खेळणारा संघ ज्यावेळी पराभूत होते, त्यावेळी चाहत्यांची अशी अवस्था होते, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

पाहा तो व्हिडीओ-

हेही वाचा: Hot & Bold सानिया मिर्झाचा ग्लॅमरस अंदाज! पाहा Photos

पाकिस्तानचा संघ साखळी फेरीत पाचपैकी पाचही सामने जिंकला होता. तो संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य होता. पण गुरूवारी स्पर्धेत पाकिस्तानचा केवळ एक पराभव झाला आणि त्यांना थेट स्पर्धेतून बाहेर जावे लागले. आता रविवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे. २०१५च्या वन डे विश्वचषक स्पर्धेतदेखील याच दोघांमध्ये फायनलचा सामना रंगला होता. त्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वचषक जिंकला होता. आता यंदाचा टी२० वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर साऱ्यांची नजर आहे.

loading image
go to top