USA vs PAK : ह्रदय कसं मोठं करायचं.... पाकिस्तानी चाहतीनं बाबर सेनेला चांगलंच सुनावलं; Video व्हायरल

Pakistani Female Fan Video : पाकिस्तानी चाहतीने बाबर सेनेवर नाराजी व्यक्त करत बाबर सेना फक्त फिरायला आली आहे का असा प्रश्न उपस्थित केला.
Pakistani Fan
USA vs PAKesakal

USA vs PAK Female Fan Video : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाला टी 20 वर्ल्डकप 2024 च्या पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला. युएसएने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला मात देत ग्रुप A मधील स्थिती अत्यंत रंजक केली. पाकिस्तानची टी 20 वर्ल्डकपची मोहीमच पराभवाने सुरू झाल्याने पाकिस्तानी चाहते प्रचंड नाराज झाले. त्यात युएसएसारख्या पहिल्यांदाच टी 20 वर्ल्डकप खेळणाऱ्या संघाकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानं चाहत्यांची प्रचंड निराशा झाली आहे. एका पाकिस्तानी चाहतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Pakistani Fan
T20 World Cup 2024 : भारत, पाकिस्तानचे जास्तच लाड चालेत.... श्रीलंकेच्या संसदेत आयसीसीवर झाला पक्षपातीपणाचा आरोप

पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर एका न्यूज चॅनलवर पाकिस्तानी चाहती प्रतिक्रिया देत होती. त्यावेळी तिने, 'ह्रदय कसं मोठं करणार, एकच तर ह्रदय आहे किती वेळा ते तोडणार? तोडून तोडून ह्रदयच संपून गेलं आहे. चकनाचूर झालं आहे. जिंकतात कमी अन् हरतात जास्त. आम्ही तर कायम समर्थन करण्यासाठी आहोत. मात्र तुम्ही कधी कामगिरी करणार?

तुम्ही कायम फक्त हवेत मोठं मोठं बोलता. काही करून मात्र दाखवत नाही. आता तर मला खरंच असं वाटू लागलं आहे की तुम्ही फक्त फिरायला येता. आमच्या भावनांची तुम्हाला कसली काळजी नाही. त्या भावना तुम्ही पायाखाली तुडवता. मी आता थकली आहे. पाकिस्तन संघाने निराशा केली आहे.'

Pakistani Fan
Pakistan Qualification Scenarios : पहिल्याच सामन्यात पराभव; पाकिस्तानच्या क्वालिफिकेशनचे झालेत वांदे, भारताला हरवलं तरी...

पाकिस्तान संघ हा 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमधील उपविजेता होता. युएसएविरूद्ध पाकिस्तानने जिंकणे अपेक्षित होते. मात्र प्रथम फलंदाजी करताना त्यांना 20 षटकात फक्त 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. युएसएने 20 षटकात 159 धावा करत सामना टाय केला.

त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये युएसएने 18 धावा करत पाकिस्तानसमोर मोठं आव्हान ठेवलं होतं. मात्र सौरभ नेत्रावळकरच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला 13 धावाच करता आल्या. युएसएने 18 धावांनी सामना जिंकत इतिहास रचला.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com