Rohit Sharma Video: जगाचं प्रेम वेगळं अन् आईची माया वेगळी; विजयी पुत्राला पाहताच रोहितच्या आईने काय केलं पाहाच...

Rohit sharma And Mother Viral Video: रोहित शर्मा अनेक दिवस आपल्या आई-वडिलांपासून दूर होता. विजयी पुत्राला पाहताच आईने त्याला गळ्याला लावले. त्याचा मायेने पापा घेतला. यावेळी रोहितचे वडील देखील उपस्थित होते.
Rohit sharma video
Rohit sharma video

मुंबई- रोहित शर्माची टीम मायदेशी आल्यापासून चाहत्यांच्या जल्लोषाला सीमा राहिलेली नाही. गेले अनेक महिने टीम परदेशात होती, आपल्या कुटुंबियांपासून दूर होती. त्यामुळे खेळाडू भारतात आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली. रोहित शर्मा अनेक दिवस आपल्या आई-वडिलांपासून दूर होता. विजयी पुत्राला पाहताच आईने त्याला गळ्याला लावले. त्याचा मायेने पापा घेतला. यावेळी रोहितचे वडील देखील उपस्थित होते.

४ जुलै हा रोहित शर्मा यांच्या आई-वडिलांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. त्यांच्या मुलाच्या नेतृत्त्वात भारताने वर्ल्डकप जिंकला आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी त्याच्याकडून झाली आहे. अशा विजयी मुलाला पाहताच आईला आनंद होणे साहजिकच. रोहित शर्मा आणि त्याची आई पूर्णिमा शर्मा यांच्यातील मायेच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rohit sharma video
India Won T20 World Cup 2024 : विश्‍वविजेत्यांना सलाम;भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईत जनसागर

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, पूर्णिमा शर्मा यांची तब्येत ठीक नाही. त्यांनी डॉक्टरची अपॉईंटमेंट देखील घेतली होती. पण, मुलाला अशा आनंदाच्या वेळी भेटण्याचा क्षण ती चुकवू शकत नव्हती. त्यामुळे रोहितच्या आईने डॉक्टरची अपॉईंटमेंट रद्द केली अन् तब्येत ठीक नसताना ती रोहितला पाहण्यासाठी आली.

पूर्णिमा शर्मा यांनी सांगितलं की, या क्षणाचा संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यामुळेच या आनंदाच्या क्षणी आम्ही सहभागी होण्यासाठी आलो. रोहितच्या आईने सांगितलं की, असा दिवस पाहता येईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण, टीम इंडियाने ते शक्य केलं आहे. रोहित आणि मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, असं त्या म्हणाल्या.

Rohit sharma video
Team India T20 World Cup Victory Parade : टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत १० जखमी; गर्भवती महिलेचा समावेश

रोहितच्या आईने यावेळी एक खुलासा देखील केला आहे. त्यांनी सांगितलं की, रोहित शर्माने याआधीच सांगितलं होतं की तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सोडून देणार आहे. त्यामुळे मी त्याला जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यास सांगितलं होतं. माझ्या मुलाला मिळणारं प्रेम पाहून मला विश्वास होत नाही. अशा प्रकारचे वातावरण मी याआधी कधी पाहिलं नाही. रोहितच्या कष्टाचे हे फळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com