Rahul Dravid: टी20 वर्ल्ड कप विजयानंतर द्रविड ड्रेसिंगमधील शेवटच्या भाषणात काय म्हणाला? BCCI ने शेअर केला Video

T20 World Cup 2024: राहुल द्रविड टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बोलताना भावूक झाला होता.
Rahul Dravid | T20 World Cup 2024
Rahul Dravid | T20 World Cup 2024Sakal

Rahul Dravid Video: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) इतिहास रचला. बार्बाडोसला झालेल्या टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

दरम्यान, या विजयानंतर राहुल द्रविडचा भारतीय संघासोबतचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळही संपला. मात्र जाता-जाता त्याला भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप विजयाची अविस्मरणीय भेट दिली.

या विजेतेपदानंतर द्रविडही भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातूनही अश्रु वाहिल्याचे सर्वांनी पाहिले.

दरम्यान, या विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये अखेरच्यावेळी बोलतानाही द्रविड भावूक झाला होता. यावेळी त्याने सर्वांचे आभार मानले, याबरोबरच रोहितने केलेल्या एका खास फोन कॉलबद्दलही खुलासा केला. द्रविडच्या भाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे

Rahul Dravid | T20 World Cup 2024
T20 World Cup Final: ऋषभ पंतच्या चतुराईचा झाला फायदा अन् क्लासेनची गेली विकेट, गावसकरांनी सांगितलं कोणता क्षण ठरला महत्त्वाचा

द्रविड म्हणाला, 'माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द कमी पडत आहेत, पण मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला या अविश्वसणीय आठवणीचा भाग करून घेतलं. मला माहित आहे तुम्ही सर्वजण या क्षणाला नेहमीच लक्षात ठेवाल.'

'मला तुमच्या सर्वांचा खूप अभिमान वाटतोय. तुम्ही ज्या परिस्थितीतून पुनरागमन केले, ज्याप्रकारे तुम्ही लढला. आपण संघ म्हणून जशी कामगिरी केली, जी लवचिकता दाखवली, ते शानदार होते.'

'गेल्या काही वर्षात आपण विजेतेपदाच्या जवळ आलो होतो, पण अनेकदा निराशा झाली. पण या संघाने जे काही केले आहे, सपोर्ट स्टाफने जे काही केले आहे, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने बरेच त्याग केले आहेत.'

'इथे असलेल्या आणि मायदेशी असलेल्या तुमच्या कुटुंबाकडे पाहा, त्यांनी तुम्ही लहान असल्यापासून खूप त्याग केले आहेत. तुम्ही इथे ड्रेसिंग रुममध्ये असण्यासाठी तुमचे पालक, पत्नी, मुले, भाऊ-बहिण, प्रशिक्षक सर्वांनीच त्याग केला आहे.'

Rahul Dravid | T20 World Cup 2024
Rahul Dravid : पुढच्या आठवड्यात मी बेरोजगार होणार... टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर राहुल द्रविड हे काय बोलला?

याशिवाय द्रविडने याबद्दलही खुलासा केला की तो २०२३ वनडे वर्ल्ड कपनंतर प्रशिक्षक पदाची जबाबदारी कायम करणार नव्हता. मात्र त्याला रोहित शर्माने फोन करून हे पद टी२० वर्ल्ड कपपर्यंत कायम करण्यासाठी मनवलं. याबद्दलही द्रविडने रोहितचे आभार मानले.

द्रविड म्हणाला, 'रोहित, तुझे खूप आभार. कारण तू मला नोव्हेंबरमध्ये फोन केला आणि मला ही जबाबदारी कायम करण्याबद्दल विचारलेस. तुमच्या सर्वांबरोबर काम करण्याची संधी मिळणे हा एक सन्मान आहे. मला माहित आहे प्रशिक्षक आणि कर्णधार, बऱ्याचदा खूप चर्चा करतात, कधी एकमेकांचे विचार पटतात, कधी नाही. तुमच्या प्रत्येकाला समजून घेणे शानदार होते.'

द्रविडने प्रशिक्षक म्हणून दुसरा वर्ल्ड कप जिंकला आहे. यापूर्वी २०१८ साली द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com