Sanju Samson latest statement today
esakal
Sanju Samson says no one will tell me what to do : भारतीय संघाच्या निवडीची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा संजू सॅमसन हे नाव हमखास ऐकायला येते. १५ वर्षांपूर्वी संजूने भारतीय संघाकडून पदार्पण केले, परंतु त्याला खेळण्याच्या संधी फार कमी मिळाल्या.. तो त्याच्या संधीची नेहमी वाट पाहताना दिसला आणि त्यामुळेच त्याच्यावर अन्याय होत असल्याची भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये नेहमी जागृत राहिली. संजूलाही मिळालेल्या संधीचा नेहमीच फायदा उचलता आलेला नाही आणि त्यामुळे तो संघाच्या आत-बाहेर करत राहिला. आताही इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या सामन्यातील अपयशानंतर वैभव सूर्यवंशीने त्याची जागा घेतली. मालिका गमावल्यानंतर पाचव्या सामन्यात संजूला पुन्हा संधी मिळाली...