टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाला मोठा धक्का! Ind vs Ban मॅचदरम्यान स्टार खेळाडू जखमी, हाताला पडले ६ टाके

India vs Bangladesh Shoriful Islam : भारताविरुद्धच्या सराव सामन्यात बांगलादेश संघाला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
shoriful islam injured in India vs BangladeshT20 World Cup 2024
shoriful islam injured in India vs BangladeshT20 World Cup 2024sakal

India vs Bangladesh Shoriful Islam : भारताविरुद्धच्या सराव सामन्यात बांगलादेश संघाला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 122 धावाच करू शकला.

बांगलादेश संघाचे ना गोलंदाज ना फलंदाज या सामन्यात काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. या सामन्यात बांगलादेशचा एक स्टार खेळाडू जखमी झाला असून टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या सामन्यात खेळणे कठीण दिसत आहे. कारण त्याच्या डाव्या हाताला सहा टाके पडले.

shoriful islam injured in India vs BangladeshT20 World Cup 2024
Hardik Pandya : 6,6,6... जलवा है हमारा! मुंबईच्या चाहत्यांची हार्दिक पांड्याने केली बोलती बंद; ठोकल्या इतक्या धावा

भारताविरुद्धच्या सराव सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामला दुखापत झाली आहे. भारताविरुद्ध त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्याने भारतीय डावातील शेवटचे षटक टाकले आणि या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शॉरीफुल इस्लामने यॉर्कर चेंडू टाकला, आणि हार्दिक पांड्याने जोरात मारला. आणि चेंडू त्याच्या दिशेने गेला जो हाताला लागला. त्यानंतर त्याचा हात सुजला. त्यामुळे शॉरीफुल इस्लाम मैदानाबाहेर गेला. भारताविरुद्धच्या सामन्यात शरीफुलने 3.5 षटकांत 26 धावांत एक बळी घेतला.

shoriful islam injured in India vs BangladeshT20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या कॉम्बिनेशन बदललं... जैस्वालची सुट्टी तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपन?

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, शॉरीफुल इस्लामची ही दुखापत बरी होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल. त्यामुळे 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपतील बांगलादेशच्या पहिल्या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. बांगलादेशला ८ जूनला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. शरीफुलची दुखापत बांगलादेशसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. बांगलादेशकडे मुस्तफिझूर रहमान, तस्किन अहमद आणि तन्झीम शकीबसारखे वेगवान गोलंदाज संघ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com