T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या कॉम्बिनेशन बदललं... जैस्वालची सुट्टी तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपन?

Virat Kohli to play as opener in T20 WC over Yashasvi Jaiswal : या स्पर्धेत मेन इन ब्लूचे प्लेइंग कॉम्बिनेशन काय असेल याची चर्चा सतत होत आहे.
 Rohit Sharma in T20 World Cup 2024
Rohit Sharma in T20 World Cup 2024SAKAL

Team India T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024चा थरार सुरू झाला आहे. 20 संघ विजेतेपदाच्या शर्यतीत सहभागी झाले आहेत. मात्र, शेवटी एकच संघ ट्रॉफी जिंकणार आहे. भारतीय संघ यावेळी चॅम्पियन होण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण या स्पर्धेत मेन इन ब्लूचे प्लेइंग कॉम्बिनेशन काय असेल याची चर्चा सतत होत आहे. यावेळी विराट कोहलीने रोहित शर्मासोबत सलामी करावी, असे अनेक माजी क्रिकेटपटूंचे मत आहे.

 Rohit Sharma in T20 World Cup 2024
Ind vs Ban : अमेरिकेत टीम इंडियाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह... सराव सामन्यात रोहितबरोबर घडली धक्कादायक घटना; Video Viral

यादरम्यान न्यू यॉर्कमधील नासाऊ स्टेडियमवर शनिवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात कर्णधार रोहित शर्माने धक्कादायक निर्णय घेतला. तुफानी फलंदाज यशस्वी जैस्वाल बाहेर बसलेले. तर संजू सॅमसनसोबत कर्णधार रोहित सलामीला आला. मात्र, हा प्रयोग फसला आणि संजू सॅमसन अवघ्या 1 धावा करून बाद झाला.

 Rohit Sharma in T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : आजपासून रंगणार टी-20 वर्ल्ड कप थरार! पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध यजमान अमेरिकेने जिंकली नाणेफेक

यशस्वी जैस्वाल खेळला नाही त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जैस्वालला संधी का दिली नाही? कर्णधार रोहितने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या सराव सामन्यात तो संघाला पाणी देताना दिसला. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासह टीम इंडियाची सलामी कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वर्ल्ड कपपूर्वी सराव सामन्यांमध्येही यशस्वी जैस्वालला संधी न दिल्यास मुख्य सामन्यांमधूनही दुर्लक्ष केले जाऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाची सलामी कोण देणार हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होत होती, त्यावर कर्णधार रोहित आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शिक्कामोर्तब करेल अशी शक्यता आहे.

सराव सामन्यात यशस्वी बाहेर बसल्यानंतर विराट कोहली रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर कोहलीने थकव्याचे कारण देत सराव सामन्यात भाग घेतला नाही.

अनेक दिग्गजांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला वर्ल्ड कपमध्ये सलामी करण्याचा सल्ला दिली आहे. विराट कोहलीने अलीकडेच आयपीएलमध्ये आरसीबीकडून ओपनिंग करताना हंगामातील सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे विराट कोहली रोहितचा जोडीदार असेल असे मानले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com