SL vs RSA T20 WC 24 : दक्षिण आफ्रिकेने लंकेला शंभरच्या आत गुंडाळले; न्यूयॉर्कची खेळपट्टी वादाच्या भोवऱ्यात?

T20 World Cup 2024
SL vs RSA T20 WC 24 esakal

SL vs RSA T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये आजच्या श्रीलंकेच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 77 धावात गुंडाळले. आफ्रिकेने 19.1 षटकात लंकाचा संपूर्ण संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रीलंकेच्या तीनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठतला आला. दक्षिण आफ्रिकेकडून नॉर्खियाने 4 षटकात 7 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडाने 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकाची ही टी 20 मधील निच्चांकी धावसंध्या ठरली.

T20 World Cup 2024
Virat Kohli: 'विराटने सलामीला फलंदाजी करावी, नाहीतर माझ्या संघात खेळूच नये', टीम इंडियाबद्दल बोलताना असं कोण म्हणालं?

न्यूयॉर्कच्या नसाऊ स्टेडियमवरील खेळपट्टीवर सकाळी सकाळी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. नॉर्खियाने दोन षटकात दोन विकेट घेत लंकेची अवस्था 3 बाद 32 धावा अशी केली. त्यानं कुशल मेंडिस अन् कमिंदू मेंडीस यांची शिकार केली. या दोघांनी अनुक्रमे 19 आणि 11 धावा केल्या होत्या.

त्यानंतर लंकेच्या इतर फलंदाजांना साधा दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. अनुभवी मॅथ्यूजने 16 चेंडूत 16 धावा केल्या. मात्र नॉर्खियाने त्याची देखील शिकार केली.

T20 World Cup 2024
IND vs IRE Playing 11 : आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात संजू अन् सिराजचा पत्ता होणार कट; टीम इंडियाचा अजून एक सराव सामना?

टी 20 वर्ल्डकपमधील निच्चांकी धावसंख्या

  • 55 - इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडीज - दुबई 2021

  • 60 - न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका - चित्तोग्राम - 2014

  • 70 - बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड - कोलकाता - 2016

  • 72 - बांगलादेश विरूद्ध ऑस्ट्रेलिया - दुबई - 2021

  • 77 - श्रीलंका विरूद्ध दक्षिण आफ्रिका - न्यूयॉर्क - 2024

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com