SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024 : श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्या टी-२० विश्‍वकरंडकातील ड गटातील साखळी फेरीची लढत रंगणार आहे.
Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024
Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024sakal

Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024 : श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्या टी-२० विश्‍वकरंडकातील ड गटातील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. श्रीलंकन संघाची गोलंदाजी व दक्षिण आफ्रिकन संघाची फलंदाजी असा हा सामना असणार आहे. याप्रसंगी वनिंगू हसरंगाचा श्रीलंकन संघ एडन मार्करमच्या दक्षिण आफ्रिकन संघाला रोखतोय का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाची फलंदाजी भक्कम आहे. क्विंटॉन डी कॉक, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्स या फलंदाजांच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिकन संघाचे श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत पारडे जड समजले जात आहे. क्लासेन याने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. हैदराबादचा संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला होता.

क्लासेनने या मोसमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने १६ सामन्यांत ४७१ धावा फटकावल्या. १७१च्या स्ट्राईक रेटने त्याने धावांचा पाऊस पाडला. स्टब्सने दिल्ली कॅपिटल्समधून खेळताना १४ सामन्यांमधून ३७८ धावा फटकावल्या. १९०च्या स्ट्राईक रेटने त्याने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची धुलाई केली. एडन मार्करमला आयपीएलमध्ये सूर गवसला नव्हता. त्यामुळे टी-२० विश्‍वकरंडक त्याच्यासाठी अत्यंत मोलाची असणार आहे.

Sri Lanka vs South Africa T20 World Cup 2024
सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क स्टेडिअम! तरी IPL, MPLच्या क्रिकेट सामन्यांची हुकली संधी; ‘ही’ आहेत दोन प्रमुख कारणे

श्रीलंकन गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे. वनिंदू हसरंगा (७.४२ इकॉनॉमी) व माहीश तीक्षणा (६.७१ इकॉनॉमी) या फिरकी गोलंदाजांवर श्रीलंकन संघाची मदार असणार आहे. मथीशा पथीराना व दिलशान मदुशंका या वेगवान गोलंदाजांना क्लासेनसह इतर फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागणार आहे.

श्रीलंकन संघ अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, धनंजया डिसिल्व्हा, दासुन शनाका यांच्यावर फलंदाजी अवलंबून असणार आहे. सध्या तरी दक्षिण आफ्रिकन गोलंदाज फॉर्ममध्ये नाहीत. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा व फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी यांच्याकडून प्रभावी गोलंदाजीची अपेक्षा आहे. ॲनरिक नॉर्खियाच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये धावांची लूट करण्यात आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघ व्यवस्थापनाला चिंता सतावत असेल.

दृष्टिक्षेपात

  • - वेस्ट इंडीजने नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला ३-० असे नमवले. याचा फायदा श्रीलंकन संघाला उद्याच्या लढतीत घेता येऊ शकतो.

  • - २०१४मध्ये टी-२० विश्‍वविजेता ठरल्यानंतर श्रीलंकन संघाला टी-२० विश्‍वकरंडकाची स्पर्धेची बाद फेरी गाठता आलेली नाही.

  • - भारत-बांगलादेश यांच्यामधील सराव सामना न्यूयॉर्क येथे पार पडला. या सामन्यात काही चेंडू गुडघ्याच्यावरदेखील उडाले नाहीत. यामुळे श्रीलंकन संघातील गोलंदाजांची आशा उंचावली असेल.

  • - श्रीलंकन संघाने मागील नऊ टी-२० सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत.

नामिबिया-ओमानमध्ये लढत

नामिबिया-ओमान यांच्यामधील ब गटातील साखळी फेरीची लढतही आज पार पडणार आहे. आफ्रिकन खंडातील पात्रता फेरीत नामिबिया संघाने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे ओमान संघासाठी आजचा पेपर सोपा नसणार आहे. ओमान संघ तिसऱ्यांदा टी-२० विश्‍वकरंडकात सहभागी होत आहे. त्यामुळे यंदा त्यांच्याकडून एक पाऊल पुढे टाकण्याचा ध्यास बाळगण्यात येईल, यात शंका नाही.

आजच्या लढती

  • नामिबिया-ओमान, ब्रिजटाऊन, सकाळी सहा वाजता

  • दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, न्यूयॉर्क, रात्री आठ वाजता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com