VIDEO : दोन टप्पी चेंडू अन् वॉर्नरचा तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AUS vs PAK
VIDEO : दोन टप्पी चेंडू अन् वॉर्नरचा तडाखा

VIDEO : दोन टप्पी चेंडू अन् वॉर्नरचा तडाखा

sakal_logo
By
सुशांत जाधव

Pakistan vs Australia, 2nd Semi-Final : दुबईच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात डेविड वॉर्नरच्या भात्यातील फटकेबाजी पुन्हा पाहायला मिळाली. सलामीवीर फिंच खातेही न उघडता परतल्यानंतर वॉर्नरने मिशेल मार्शच्या साथीनं संघाच्या डावाला आकार दिला. त्याने मार्शसोबत दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर शदाब खानने त्याला मोहम्मद रिझवान करवी झेलबाद केले.

तत्पूर्वी 8 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक वॉर्नरने मोहम्मद हाफिजच्या चेंडूवर मारलेला एक फटका कमालीचा असा होता. वॉर्नरने आपल्या 49 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. आठव्या षटकातील पहिला चेंडू मोहम्मद हाफिजच्या हातून निसटल्याचे दिसले. दोन टप्पे पडलेल्या चेंडूपर्यंत पोहचत वॉर्नरने षटकार खेचला. मैदानातील पंचांनी हा चेंडू नो बॉल दिला.

हेही वाचा: T20 WC: बाबरचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोहलीला पुन्हा 'धोबी पछाड'

शदाब खानने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली. या षटकाराचा बदला घेत शदाब खानने वॉर्नरला माघारी धाडले. एवढेच नाहीतर त्याने मार्श आणि स्मिथसह ग्लेन मॅक्सवेलचीही विकेट घेतली. शदाब खानने आपल्या 4 षटकांत 26 धावा खर्च करुन चार गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.

हेही वाचा: T20 WC : सेमी फायनलमध्ये 2019 वर्ल्ड कप फायनलचा फ्लॅशबॅक! VIDEO

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद रिझवान आणि फखर झमानच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानन निर्धारित 20 षटकात 176 धावा करुन ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे आव्हान ठेवले होते.

loading image
go to top