RSA vs BAN : बांगलादेश संघाचा तोंडघशी पडण्याचा सिलसिला!

एकाच कॅलेंडर इयरमध्ये बांगलादेशचा संघ तिसऱ्यांदा शंभरीच्या आत गुंडाळला आहे.
South Africa vs Bangladesh
South Africa vs BangladeshTwitter

South Africa vs Bangladesh : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा संघ अवघ्या 84 धावांत आटोपला. सुपर 12 मधील पहिल्या गटातून सेमीफायनलची वाट पक्की करण्याच्या दिशेने दक्षिण आफ्रिका संघाने आणखी एक पाउल पुढे टाकले. दुसरीकडे स्पर्धेतील प्रवास आधीच संपुष्टात आलेल्या बांगलादेश संघावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. एकाच कॅलेंडर इयरमध्ये बांगलादेशचा संघ तिसऱ्यांदा शंभरीच्या आत गुंडाळला आहे.

बांगलादेश संघावर न्यूझीलंड दौऱ्यावर अशीच नामुष्की ओढावली होती. न्यूझीलंडने त्यांना 76 धावांत ऑल आउट केले होते. दुसऱ्यांदा न्यूझीलंडसमोरच बांगलादेश संघाची घरच्या मैदानावर नाच्चकी झाली होती. मिरपूरच्या मैदानातही बांगलादेशचा संघा 76 धावांत आटोपला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांचा खेळ 84 धावांत खल्लास झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या नावे 70 ही निचांक्की धावसंख्या आहे. कोलकाताच्या मैदानात 2016 मध्ये न्यूझीलंडनेच त्यांना 70 धावांत आटोपले होते.

South Africa vs Bangladesh
कर्णधार विराटला काँग्रेसच्या युवराजाची साथ

सुपर 12 मधील पहिल्या गटात बांगलादेशने पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. उर्वरित दोन सामन्यातील विजयासह स्पर्धेतील शेवट गोड करण्याच्या इराद्याने बांगलादेशचा संघ मैदानात उतरला होता. पण रबाडा आणि नॉर्तजे जोडीच्या भेदक माऱ्यासमोर संघ तोंडघुशी पडला. मेहंदी हसनने बांगलादेशकडून सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. दुसरीकडे रबाडा आणि नॉर्तजेशिवाय शम्सीने 2 आणि प्रेट्रोरियसने 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com