श्रीलंकेसमोर आफ्रिकेचा डंका; निसंकाची अर्धशतकी खेळी व्यर्थ

तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या पराभवामुळे श्रीलंका संघ अडचणीत सापडला आहे.
South Africa vs Sri Lanka
South Africa vs Sri LankaSakal
Summary

सुपर 12 मधील पहिल्या गटात दक्षिण आफ्रिकेनं आपली दावेदारी भक्कम करण्याच्या दिशेने पाउल टाकले.

South Africa vs Sri Lanka : तरबेज शम्सीच्या फिरकीनंतर कर्णधार टेम्बा बवुमाने केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या पराभवामुळे श्रीलंका संघ अडचणीत सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तरबेज शम्सीची फिरकी, ड्वेन प्रेटोरियस आणि नोर्तजेच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ निर्धारित 20 षटकात 142 धावांत आटोपला. सलामीवीर निसंकाने 58 चेंडूत 72 धावांची दमदार खेळी करत एकाकी झुंज दिली. असलंका 21 आणि कर्णधार शनाकाच्या 11 धावा वगळता अन्य एकालाही दुहेरी आकडा पार करता आला नाही.

South Africa vs Sri Lanka
T20 WC लॉर्ड शार्दुल Playing 11 मध्ये दिसणार? कोहली म्हणाला...

या धावाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली. धावफलकावर अवघ्या 25 धावा असताना रिझा हॅड्रीक्स 11 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ क्विंटन डी कॉकनंही मैदान सोडले. त्याने 12 धावा केल्या. रेसी वेन डर डुसेनच्या रुपात आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. त्याने 11 चेंडूत 16 धावा केल्या. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कर्णधार तेम्बा बवुमाने 46 चेंडूत 46 धावा करत संघाचा डाव सावरला. डेविड मिलर 13 चेंडूत नाबाद 23 आणि रबाडाने 7 चेंडूत 13 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून हसरंगाने सर्वाधिक 3 तर चमीराने 2 विकेट घेतल्या.

South Africa vs Sri Lanka
पाक महिला जर्नलिस्टची भज्जीनं घेतली फिरकी

सुपर 12 मधील पहिल्या गटात दक्षिण आफ्रिकेनं आपली दावेदारी भक्कम करण्याच्या दिशेने पाउल टाकले. दुसरीकडे श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. तीन पैकी दोन सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 4 गुण जमा झाले असून श्रीलंकेचा संघ तीन सामन्यानंतर एका विजयासह दोन गुणावरच आहे. त्यामुळे त्यांचा स्पर्धेतील पुढचा प्रवास खडतर झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com