T20 World Cup 2022 : या शहरात खेळला जाईल अंतिम सामना; ७ शहरात होणार ४५ सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC T20 World Cup

या शहरात खेळला जाईल अंतिम सामना; ७ शहरात होणार ४५ सामने

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : महिनाभर चाललेला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (ता. १४) खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तब्बल आठ आयसीसी कप आपल्या नावावर केले आहे. असा पराक्रम करणारा तो एकमेव देश आहे. पुढील विश्वचषक ऑस्ट्रेलियातच खेळला जाणार आहे. सामने कधी आणि कुठे खेळले जातील याची तारीखही घोषित करण्यात आली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या पुरुष टी-२० विश्वचषकाचा ऑस्ट्रेलिया आयोजक आहे. या स्पर्धेचे सामने कोणत्या शहरात खेळवले जाणार आहेत हे समोर आले आहे. मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन, पर्थ आणि ॲडलेडसह ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये एकूण ४५ सामने खेळले जातील. तसेच इतर दोन शहरांमध्ये जिलाँग आणि होबार्ट या स्पर्धेचे सामने खेळवले जातील.

हेही वाचा: IND vs NZ : टी-२० मधून केन विल्यमसनची माघार

हे देश सुपर १२ साठी पात्र

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या सुपर १२ साठी पात्र ठरलेल्या संघात टी-20 चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता न्यूझीलंडसह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.

९ व १० नोव्हेंबरला उपांत्य सामने

विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही उपांत्य फेरीचे सामने सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि ॲडलेडमधील ओव्हल मैदानावर खेळवले जातील. पहिला उपांत्य सामना ९ नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट मैदानावर तर दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबरला ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर अंतिम सामना?

अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयोजिण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या स्पर्धेत ४५ सामने खेळवले जातील.

loading image
go to top