IND vs NZ : टी-२० मधून केन विल्यमसनची माघार; कसोटीसाठी घेतली निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kane Williamson

IND vs NZ : टी-२० मधून केन विल्यमसनची माघार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : नुकताच टी-२० विश्वचषक पार पडला. सर्व संघांना नमवून ऑस्ट्रेलियाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. न्यूझीलंडचा संघ उपविजेता ठरला. आता न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते तीन टी-२० सामने व कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, दौऱ्यावर येण्यापूर्वीच केन विल्यमसनने माघार घेतल्याची समजते.

बुधवारपासून (ता. १७) भारताविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी न्यूझीलंडचा १४ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. फलंदाजीची जबाबदारी डॅरिल मिशेल, मार्टिन गप्टिल, ग्लेन फिलिप्स यांच्या खांद्यावर असेल. टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. इश सोधी आणि मिचेल सँटनर फिरकी गोलंदाज म्हणून संघाला मजबूत करतील. मात्र, कर्णधार केन विल्यमसन संघासोबत नसेल.

हेही वाचा: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कुत्र्यांचा बळी; अधिकाऱ्यांवर दबाव

टी-२० मालिकेनंतर दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना ३ डिसेंबरपासून मुंबईत होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग राहणार आहे. यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने विल्यमसनने टी-२० मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टीम साऊदीकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

बुधवारी पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. दुसरा सामना शुक्रवारी होणार तर शेवटचा सामना रविवारी होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “कसोटी संघाचे विशेषज्ञ खेळाडू जयपूरमध्ये आधीच प्रशिक्षण घेत आहेत. विल्यमसन आता या गटात सामील होणार आहे. कारण, त्याला कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

हेही वाचा: ‘कंगना राणावतवर मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करा’

टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ

मार्टिन गप्टिल, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टीम सेफर्ट, मार्क चॅपमन, जिमी नीशम, काईल जेम्सन, इश सोधी, मिचेल सँटनर, टॉड ॲश्टेल, ॲडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, टीम सौदी (कर्णधार)

loading image
go to top