T20 World Cup: टॉस होताच शिक्कामोर्तब झालं! रोहित शर्मासह 'हा' खेळाडू आयर्लंडविरुद्ध करणार सलामीला फलंदाजी

Team India Openers: टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासह भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजी कोण करणार, यावर बरीच चर्चा झाली. पण अखेर आयर्लंडविरुद्ध टॉस जिंकल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
India vs Ireland | T20 World Cup
India vs Ireland | T20 World CupSakal

India vs Ireland: टी20 वर्ल्ड कपचे नववे पर्व वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवले जात आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध बुधवारी (5 जून) हा सामना होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाणेफक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेल्या खेळाडूंबद्दल माहिती दिली. यावेळी त्याने सांगितले की यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता रोहितबरोबर विराट कोहली सलामीला फलंदाजी करेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

India vs Ireland | T20 World Cup
IND vs PAK T20 World Cup : भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का! स्टार अष्टपैलू जखमी, 'या' सामन्यातून बाहेर

गेल्या अनेक दिवसांपासून भारतासाठी या स्पर्धेत सलामीला फलंदाजी कोण करणार याबाबत चर्चा होत आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही याबाबत मतं मांडली होती.

तसेच विराटने आयपीएल २०२४ मध्ये सलामीला शानदार फलंदाजी करताना ७४१ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाची सलामी जोडी हा चर्चेचा विषय ठरला होता. पण आता अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, टी२० वर्ल्ड कपमधील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताने जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज या तिन्ही वेगवान गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच फिरकी गोलंदाजीसाठी रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे दोन्ही फिरकीपटूंना बेंचवर बसावे लागले आहे.

India vs Ireland | T20 World Cup
Rohit Sharma Video: 'जेव्हा ICC स्पर्धा खेळातो, तेव्हा...', तब्बल नववा टी20 वर्ल्ड कप खेळण्याआधी रोहितने सांगितला अनुभव

फलंदाजी फळीत यष्टीरक्षक ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव हे असून शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

भारत आणि आयर्लंडचे प्लेइंग इलेव्हन -

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बलबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com