T20 World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात कोण असणार अंपायर? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

India vs Pakistan live Streaming details: रविवारी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान कोण अंपायर असणार आहेत आणि हा सामना कुठे अन् कसा पाहाणार जाणून घ्या.
India vs Pakistan
India vs PakistanSakal

T20 World Cup 2024, India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या कट्ट्रर प्रतिस्पर्धी असलेल्या संघातील क्रिकेट सामना चर्चेचा विषय असतो. या संघात होणाऱ्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असताच. आता या दोन संघातील टी20 वर्ल्ड कप 2024 मधील बहुप्रतिक्षित सामना रविवारी (9 जानेवारी) होणार आहे.

न्युयॉर्कमधील नव्याने बांधण्यात आलेल्या नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी कोण प्रशिक्षक असणार आहे, याची माहिती समोर आली आहे.

India vs Pakistan
Babar Azam : मैं क्या बोल रहा हैं तू क्या... इंग्रजी प्रश्न येताच बाबर गोंधळला भलतीकडेच भरकटला; Video व्हायरल

या सामन्यासाठी आयसीसीने मैदानावर पंच म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ आणि रोडनी टकर यांची निवड केली आहे. तसेच सामनाधिकारी म्हणून डेव्हिड बून जबाबदारी सांभाळणार आहेत. याशिवाय टीव्ही अंपायर ख्रिस गॅफनी असतील, तर फोर्थ अंपायर शाहिद सैकत असणार आहेत.

दरम्यान, हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा टी20 वर्ल्ड कप 2024 मधील प्रत्येकी दुसरा सामना आहे. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडला पराभूत केले आहे, तर पाकिस्तानला मात्र अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावे लागले होते.

त्यामुळे आता रविवारी भारतीय संघ विजयाची लय कायम राखणार की पाकिस्तान मागचा पराभव विसरून विजयी मार्गावर परतणार हे पाहावे लागणार आहे.

India vs Pakistan
T20 World Cup, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी 'हे' दोन खेळाडू ठरणार एक्स फॅक्टर, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा इशारा

आमने-सामने आकडेवारी

भारत आणि पाकिस्तान टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात आत्तापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील 6 वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर 1 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला होता.

तसेच एकूण आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान संघात 12 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 9 सामने भारताने जिंकले आहेत, तर 3 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com