Team India | T20 World Cup 2024
Team India | T20 World Cup 2024Sakal

Team India Return: वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात येण्याचं शेड्युल पुन्हा बदललं, जाणून घ्या खेळाडू कधी परतणार?

T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ दिल्लीमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित होते, मात्र आता पुन्हा त्यात बदल झाले आहेत.

Team India Return Home Update: भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला आणि टी20 वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरले.

मात्र, सध्या बार्बाडोसमध्ये बेरील नावाच्या वादळाचा धोका आहे. याचमुळे भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्येच अडकला आहे.

दरम्यान, यानंतर बुधवारी (3 जुलै) संध्याकाळपर्यंत बीसीसीआयने सोय केलेल्या विमानाने भारतीय संघ दिल्लीत येणे अपेक्षित होते. मात्र या वादळामुळे आता त्यांच्या आगमानासाठी आणखी उशीर होणार आहे. आलेल्या नव्या अपडेटनुसार आता गुरुवारी पहाटे भारतीय संघ दिल्लीमध्ये उतरेल.

Team India | T20 World Cup 2024
T20 World Cup Final: ऋषभ पंतच्या चतुराईचा झाला फायदा अन् क्लासेनची गेली विकेट, गावसकरांनी सांगितलं कोणता क्षण ठरला महत्त्वाचा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचे आगमन बेरील वादळामुळे लांबले आहे. याशिवाय आता अशीही माहिती समोर आली आहे की बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोय केलेल्या विमानातून भारतीय संघातील सदस्यांसह भारतीय पत्रकारांनाही घेऊन येणार आहेत. ते देखील सध्या बार्बाडोसमध्ये अडकले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून बार्बाडोसमध्ये वादळ येणार असल्याने तेथील व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यादरम्यान, भारतीय संघाशी संबंधित असलेल्या सर्वांचीच विशेष काळजी घेण्यात आली. हॉटेलमध्ये त्यांना सोयीसुविधा पुरवण्यात आल्या, अशी माहिती बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली यांनी दिली आहे.

Team India | T20 World Cup 2024
Virat Kohli: 'विराटला गोलंदाजांनी वाचवलं, सामनावीर तो नव्हे...' T20 वर्ल्ड कप फायनलनंतर मांजरेकर कडाडले

दरम्यान, भारतीयांना संघ मायदेशी येण्याची उत्सुकता लागली आहे. आता भारतीय संघाचा स्वागत समारंभ कसा आयोजित केला जाणार, हे देखील पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. टी20 वर्ल्ड कप जिंकण्याबद्दल बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.

अंतिम सामन्यात भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या होत्या. 177 लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 8 बाद 169 धावाच करता आल्या.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com