मी तुझ्या घरातला TV फोडला होता? भज्जीनं घेतली अमीरची फिरकी | Harbhajan Singh vs Mohammad Amir war of words | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh vs Mohammad Amir
मी तुझ्या घरातल्या TV फोडला होता? भज्जीनं घेतली अमीरची फिरकी | Harbhajan Singh vs Mohammad Amir war of words

मी तुझ्या घरातला TV फोडला होता? भज्जीनं घेतली अमीरची फिरकी

Cup Harbhajan Singh vs Mohammad Amir in a war of words on Twitter : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'हायहोल्टेज' सामन्याचा 'करंट' अजूनही झटके देताना दिसतोय. क्रिकेट जगतातील बहुचर्चित लढत होऊन चार दिवस उलटल्यानंतरही भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांची बरसात थांबण्याचे नाव घेत नाही. या सामन्यावरुन भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद अमीर यांच्यात रंगलेले शाब्दिक युद्ध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पाकिस्तान संघाने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय नोंदवल्यानंतर मोहम्मद अमीरने (Mohammad Amir) भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला (Harbhajan Singh) ला डिवचण्याचा प्रकार केला. भारत पाकिस्तान यांच्यातील लढतीनंतर मोहम्मद अमीरने एक ट्विट केले. सामन्यानंतर भज्जी पाजीने TV सेट तर नाही ना फोडला? असे ट्विट मोहम्मद अमीरने केले होते. यात त्याने भज्जीला मेंशनही केलंय. शेवटी काय हा क्रिकेटचा खेळ आहे, असा टोलाही त्याने लगावला होता.

हेही वाचा: T20 WC: भन्नाट कॅच!! डेवॉन कॉनवेने थेट हवेत घेतली झेप अन्...

मोहम्मद अमीरच्या या ट्विटवर भज्जीनं खतरनाक रिप्लाय दिलाय. भज्जीनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला षटकार खेचून विजय मिळवून दिल्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. भारतीय संघाला 2 चेंडूत 3 धावांची गरज असताना भज्जीने मोहम्मद अमीरला षटकार खेचला होता. या गोष्टीची आठवण करुन देत भज्जीनं मोहम्मद अमीरची बोलती बंद केलीये. आता तूच बोलशील. हा षटकार तुझ्या घरातल्या टीव्हीवर जाऊन पडला होता का? काही नाही शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे, या कॅप्शनसह हरभजनने मोहम्मद अमीरला सडेतोड उत्तर दिले आहे.

हेही वाचा: IND vs PAK: पाकिस्तानच्या वकारने अखेर हिंदुंची मागितली माफी

कोणत्या सामन्यात भज्जीनं अमीरला षटकार मारत पाकला केल गरीब

2010 मध्ये आशिया कप स्पर्धेत दाम्बुलाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. पाकिस्तान संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 267 धावा करत भारतासमोर 268 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अखेरच्या षटकात भारतीय संघाला 6 चेंडूत 6 धावांची गरज होती. पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीनं शेवटच्या षटकात मोहम्मद अमीरच्या हाती चेंडू सोपवला. अमीरच्या पहिल्या चेंडूवर रैनाने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर रैना धावबाद झाला. 4 चेंडूत 5 धावांची गरज असताना भज्जी आणि प्रवीण कुमार मैदानात होता. तिसऱ्या चेंडूवर प्रवीण कुमारने दोन आणि चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. अखेरच्या दोन चेंडूत 3 धावांची आवश्यकता असताना भज्जीनं षटकार खेचून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

Web Title: T20 World Cup Harbhajan Singh Vs Mohammad Amir In A War Of Words On Twitter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..