

T20 World Cup 2021: टीम इंडियाचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध २४ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून तयारी करत आहे. कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. या सामन्याबद्दल आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने आपले मत व्यक्त केले.
"यंदाच्या टी२० विश्वचषकात पहिल्या गटातून इंग्लंड आणि विंडिजचा संघ सेमी फायनलमध्ये जाईल. तर दुसऱ्या गटातून पाकिस्तान आणि भारत हे दोन संघ सेमीफायनलला पोहोचतील, असा माझा अंदाज आहे. यात एक महत्त्वाची बाब अशी की पाकिस्तानचा संघ जर भारताविरूद्ध पराभूत झाला, तर मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावरील पुढील गोष्टी अवलंबून असतील. भारताविरूद्ध पाकिस्तानचा संघ जिंकतो की हारतो यावर खूप काही अवलंबून आहे. जर पाकिस्तानचा संघ सलामीला भारताविरूद्ध पराभूत झाला तर मात्र पाकिस्तानच्या संघाची पुढील फेरीत जाण्याची शक्यता नक्कीच कमी होईल", असं ब्रॅड हॉग म्हणाला.
भारत-पाक सामन्याआधी शोएब अख्तर म्हणतो...
"पाकिस्तानातील क्रिकेटरसिकांना भारतीय खेळाडू आवडतात. ते भारतीय क्रिकेटर्सची मनसोक्त स्तुती करतात. पाकिस्तानी फॅन्स विराट कोहलीचं कौतुक करत असतात. रोहित शर्माची थोडी जास्त प्रशंसा केली जाते. रोहित पाकिस्तानात विराटपेक्षा थोडासा अधिक लोकप्रिय आहे. पाकिस्तानात रोहित शर्माला भारताचा इंजमाम असं म्हटलं जातं. इंजमामने पाकिस्तानला अनेक सामने जिंकवून दिले. तसंच रोहितही प्रतिभावान फलंदाज आहे", असं मत रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने व्यक्त केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.