T20 World Cup: वर्ल्ड कप मोहिम सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला टेन्शन, द्रविडने व्यक्त केली दुखापतीची भीती

Rahul Dravid: टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळण्यापूर्वीच द्रविडने खेळाडूंना काळजी घेण्यास सांगितली आहे.
Rahul Dravid | Rohit Sharma
Rahul Dravid | Rohit SharmaX/ICC

Rahul Dravid News: टी20 वर्ल्ड कपचे नववे पर्व रविवारपासून (2 जून) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरू झाले आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातही न्युयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिल्यांदाच सामने होणार आहेत.

त्यामुळे या सामन्याची खेळपट्टी आणि मैदानाबाबत अद्यापही उत्सुकता आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाला या स्टेडियमवर पहिल्याच फेरीतील तीन सामने खेळायचे आहेत.

तथापि, भारतीय संघ 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध या स्टेडियमवर सराव सामना खेळला आहे. त्यामुळे साधारण खेळपट्टीचा अंदाज भारतीय संघाला आला आहे, याबद्दलच भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने भाष्य केले आहे.

Rahul Dravid | Rohit Sharma
Yuvraj Singh: टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला युवीचा 'गुरुमंत्र'; भारत-पाकिस्तान सामन्यावरही दिली मोठी प्रतिक्रिया

द्रविडने या नव्या मैदानात दुखापतीची भितीही व्यक्त केली आहे. बीसीसीआयने वेबसाईटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, 'मैदान थोडं सॉफ्ट आहे. त्यामुळे खेळाडू हॅमस्ट्रिंग आणि पोटरीवरील होणारा परिणाम अनुभवी शकतात. त्यामुळे आम्हाला यावर काम करावे लागेल आणि खेळाडूंनाही स्वत:ची काळजी घ्यावी लागेल.'

'कधीकधी खेळपट्टी थोडी स्पॉन्जीही वाटली. पण मला वाटतं आम्ही त्याचा चांगला सामना केला. आम्ही त्याला ताळमेळ चांगला ठेवला. आम्ही फलंदाजी केली आणि मला वाटतं की त्या खेळपट्टीवर अपेक्षेपेक्षा आम्ही जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजीही चांगली केलेली.'

Rahul Dravid | Rohit Sharma
Gautam Gambhir: 'मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...', अखेर गंभीरने मौन स्पष्टच सांगितलं

सराव सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 182 धावा केलेल्या. भारताकडून ऋषभ पंतने 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली होती. तसेच हार्दिक पांड्याने 23 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून मेहदी हसन, शोरीफुल इस्लाम आणि तन्वीर इस्लाम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

त्यानंतर बांगलादेशला 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 9 बाद 122 धावाच करता आल्या होत्या. बांगलादेशकडून मेहमुद्दुलाहने 40 धावांची खेळी केली होती.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या, तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com