T20 WC : इंग्लंड-न्यूझीलंडशी तर पाक ऑस्ट्रेलियाशी भिडणार

सेमी फायनलच्या लढतीत कोण मारणार बाजी?
T20 World Cup semi finalist
T20 World Cup semi finalist Sakal
Summary

सेमी फायनलसाठी राखीव दिवसही नियोजित आहे.

T20 World Cup semi final matches confirmed : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 12 मधील भारत-नामिबिया यांच्यातील लढतीपूर्वीच सेमी फायनलमधील चार संघ पक्के झाले आहेत. दुपारच्या सत्रातील अफगाणिस्तानसह टीम इंडियाचा स्पर्धेतील खेळ खल्लास करत न्यूझीलंडने सेमी फायनलचे तिकीट बूक केले. यापूर्वी पहिल्या गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सुपर 12 मधील दुसऱ्या गटातून पाकिस्तानने सेमी फायनल पक्की केली होती.

सुपर 12 मधील पहिल्या गटात पाच पैकी चार सामन्यातील विजयासह उत्तम नेट रन रेटस 8 गुण मिळवत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानी राहिला. तर ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सुपर 12 मध्ये पाकिस्तानने अपराजित राहत पाच पैकी पाच सामने जिंकून दुसऱ्या गटात अव्वलस्थान कायम राखले. या गटात न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला.

T20 World Cup semi finalist
T20 WC : भारताच्या जावायाच्या जोरावर स्कॉटलंडसमोरही पाकिस्तानचा थाट

10 नोव्हेंबरला सुपर 12 मधील पहिल्या गटातील अव्वलस्थानी राहिलेला इंग्लंडचा संघ सुपर 12 मधील दुसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. यातील विजेता संघ फायनलमधील आपेल स्थान पक्के करेल. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा सामना अबूधाबीच्या मैदानात रंगणार आहे.

T20 World Cup semi finalist
‘भाईनच भावाची लावली ना’; सेमिफायनल प्रवेश हुकल्यावर ‘मिम्स’

11 नोव्हेंबरला सुपर 12 मधील दुसऱ्या गटातील अपराजित आणि अव्वलसंघ असलेला पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन हात करेल. यातील विजेता 14 नोव्हेंबरला पहिल्या सेमी फायनलमधील विजेत्याशी फायनल खेळेल. हा सामना दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार असून पाकिस्तानसाठी ही ऑस्ट्रेलियापेक्षा जमेची बाजू असेल.सेमी फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असून जर सामना बरोबरीत सुटला तर निकाल हा सुपर ओव्हरच्या माध्यमातून लावण्यात येईल. फायनल लढत दुबईच्या मैदानात रंगणार असून या मैदानावर कोण खेळणार आणि फायनल बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com