T20 World Cup: विंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना PNG च्या खेळाडूंना अश्रु अनावर, ICC ने शेअर केला Video

Papua New Guinea Players Shed Tears: टी20 वर्ल्ड कप 2024 मधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु असताना पापुआ न्यू गिनीच्या खेळाडूंना अश्रु अनावर झाले होते.
PNG Cricket Team
PNG Cricket TeamSakal

T20 World Cup 2024, WI vs PNG: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारी (2 जून) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेचे नववे पर्व खेळवण्यात येत आहे. तसेच यंदा पहिल्यांदाच 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या 20 संघांमध्ये पापुआ न्यु गिनी (PNG) हा संघ देखील आहे.

पीएनजी संघाचा या स्पर्धेतील पहिलाच सामना यजमान वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पार पडला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात पीएनजीने वेस्ट इंडिजला चांगली झुंज दिली, मात्र त्यांच्या पदरी अखेरीस पराभव पडला. मात्र असे असले तरी पीएनजी संघासाठी हा सामना भावनिक ठरला.

PNG Cricket Team
T20 World Cup: विंडिजची विजयी सलामी! PNG ने फोडलेला घाम, पण अखेरीस रोस्टनच्या आक्रमणामुळे यजमानांनी केलं टार्गेट 'चेस'

टी20 वर्ल्ड कपसाठी इस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफिकेशनमधून पीएनजीने पात्रता मिळवली होती. टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे, त्यामुळे मिळालेल्या या मोठ्या संधीनंतर पीएनजीच्या खेळाडूंना अश्रु अनावर झाले होते.

सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होते. यावेळी पीएनजीचे राष्ट्रगीत सुरु असताना त्यांच्या संघातील अनेक खेळाडूंचे डोळ्यांमधून अश्रु वाहू लागले होते. या घटनेचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या सामन्यात पापुआ न्यु गिने सेसे बाऊच्या (50) अर्धशतकाच्या जोरावर पीएनजीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 136 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजने 137 धावांचे लक्ष्य 19 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे पीएनजीला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.

PNG Cricket Team
Papua New Guinea Landslide: निसर्गाचा कोप! भीषण दुर्घटनेत दोन हजार लोक जिवंत गाडले गेले; नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच पीएनजीमध्ये उद्भवलेली मोठी आपत्ती

टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होण्याच्या काही दिवसांपूर्वीच पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय मदतीचीही गरज भासली आहे. या दुर्घटनेत 2000 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागल्याचे अनेक रिपोर्ट्स आले आहेत.

देशाची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतात हे भूस्खलन झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com