भारताचं 'पॅक-अप', न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये; अफगाणिस्तानही बाहेर

'अ' गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तर 'ब' गटातून पाकिस्तान, न्यूझीलंड उपांत्य फेरीत
Team-India-Out-of-T20-WC
Team-India-Out-of-T20-WC
Summary

'अ' गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तर 'ब' गटातून पाकिस्तान, न्यूझीलंड उपांत्य फेरीत

NZ vs AFG, T20 World Cup: तीन संघांचे भवितव्य ठरवणाऱ्या सामन्यात अखेर न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानविरूद्ध विजय मिळवला आणि सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. त्यांनी अफगाणिस्तानचा ८ गडी आणि ११ चेंडू राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयामुळे अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर गेलंच पण त्यासोबतच भारतीय संघाचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारताचे सध्या ४ गुण आहेत. उद्याचा नामिबियाविरूद्धचा सामना जिंकला तरीही भारताचे केवळ ६ गुण होतील. पण आज न्यूझीलंडने ५ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह ब गटाच्या गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे भारताने उद्याचा सामना कितीही मोठ्या फरकाने जिंकला तरीही ते न्यूझीलंडपेक्षा २ गुणांनी मागेच राहतील.

Team-India-Out-of-T20-WC
हरभजनने निवडलेल्या T20 संघात विराट, हार्दिकला जागा नाही!
Team-India-Out-of-T20-WC
IND vs SCO: जसप्रीत बुमराहचा भेदक मारा; केला धडाकेबाज विक्रम

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी केली. अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात केवळ १२४ धावांपर्यंत मजल मारली. हजरतुल्लाह झझाई (२), मोहम्मद शहजाद (४) आणि रहमानुल्लाह गुरबाज (६) यांनी निराशा केली. गुलबदीने नईबनेही (१५) वाईट कामगिरी केली. खालच्या फळीतही मोहम्मद नबी (१४), करीम जनत (२), राशिद खान (३) यांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. पण नजीबुल्लाह झादरान याने एका बाजून खिंड लढवली. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार खेचत ४८ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीच्या जोरावरच संघाने १२०चा आकडा पार केला.

Team-India-Out-of-T20-WC
NZ vs AFG: बोल्टचा भेदक मारा; न्यूझीलंडला १२५ धावांचे आव्हान

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने दमदार सुरूवात केली होती. मार्टीन गप्टील (२८) आणि डॅरेल मिचेल (१७) यांनी संयमी सलामी दिली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने सर्वाधिक नाबाद ४० धावा केल्या. त्याला डेवॉन कॉनवेने नाबाद ३६ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी संघाला ८ गडी आणि ११ चेंडू राखून पराभूत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com